Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी शाम तिवारी

कार्याध्यक्षपदी सुभाष भालेराव, सचिवपदी संजय अहिरे

संगमनेर ः पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या तालुकाध्यक्षपद

BREAKING: देवेंद्र फडणवीसवर गुन्हा दाखल | LokNews24
अमृतवाहिनी च्या 80 विद्यार्थ्यांची इन्फोसिस व एक्सेन्चर मध्ये निवड
बालभारतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले : पाटील

संगमनेर ः पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक नायकचे कार्यकारी संपादक शाम तिवारी, कार्याध्यक्षपदी दिव्य मराठीचे प्रतिनिधी सुभाष भालेराव, उपाध्यक्षपदी दैनिक भास्करचे प्रतिनिधी भारत रेघाटे, दैनिक लोकमत प्रतिनिधी योगेश रातडिया (ग्रामिण) तर सचिवपदी दैनिक युवावार्ताचे उपसंपादक संजय अहिरे, खजिनदार म्हणून सार्वभौमचे सुशांत पावसे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले, मार्गदर्शक विलास गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी सचिन जंत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्ष शेखर पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. तसेच यावेळी नवनिर्वाचित कार्यकरिणीमध्ये अध्यक्षपदी शाम तिवारी, कार्याध्यक्ष सुभाष भालेराव, उपाध्यक्ष भारत रेघाटे, योगेश रातडिया, सचिव संजय अहिरे, खजिनदार सुशांत पावसे, सल्लागार विलास गुंजाळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शेखर पानसरे, गोरक्ष नेहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन पदाधिकार्‍यांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS