पुणे/प्रतिनिधी ः शिक्षक, आरटीओ तसेच नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांकडून तब्बल 4 कोटी 85 लाख उकळल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या राज्य परि
पुणे/प्रतिनिधी ः शिक्षक, आरटीओ तसेच नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांकडून तब्बल 4 कोटी 85 लाख उकळल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, सुसरोड) यांना पुणे लष्कर न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दराडे यांना 12 ऑगस्टपर्यंत तुरुंगांत राहावे लागणार आहे.
दराडे यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) याला चार एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती अद्याप तो कारागृहात आहे. दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात संगणमत करून फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सुर्यवंशी (50, रा. मु. पो. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक या पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 12 लाख व 15 लाख रुपये असे 27 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करुन त्यांचे पैसे परत केले नाही. अशाच प्रकारे 44 जणांचा विश्वास संपादन करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी 12 आणि 15 लाख रुपये घेतल्याचा शैलजा दराडेंवर आरोप आहे. शैलजा दराडे यांनी हे पैसै त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्या मार्फत पुण्यातील हडपसर भागात घेतल्याच तक्रारदार पोपट सुर्यवंशी यांनी दिली होती. मात्र पैसै देऊन देखील सूर्यवंशी यांना नोकरी न मिळवल्याने पोपट सुर्यवंशी यांनी पेसै परत मागीतले, मात्र ते देण्यास शैलजा दराडे यांनी नकार दिला. त्यामुळे पोपट सूर्यवंशी यांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. तक्रारदार पोपट सुर्यवंशी आणि शैलजा दराडे यांच्यात मोबाईलवरून 2019 मध्ये संभाषणाची एक ऑडिओ क्लीप देखील समोर आल होती. ज्यामधे शैलजा दराडे या फक्त शिक्षण विभागातच नाही तर आरटीओमधे जर कोणाला नोकरी हवी असेल तर आपण ती लाऊन देऊ शकतो असे सांगत असल्याचे पुढे आले आहे. त्यासाठी पन्नास लाख रुपये त्यांनी मागितले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल तपासणी केल्यावर या प्रकारात शैलजा दराडे या दोषी आढळल्या. यामुळे त्यांना अटक करण्यात आली. शैलजा दराडेंच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे यांनाही यापूर्वी टीईटी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार शैलजा दराडेंकडे सोपवण्यात आला होता. मात्र शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडून जमा केले होते. ही रक्कम पाच कोटींच्या घरात असल्याचे तपासात समोर आले आहे.
COMMENTS