Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक

हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे प्रतिनिधी - महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत पाटलांनी घेतली शेतकऱ्यांची भेट (Video)
नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सूचना मागविण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश
चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा जाहीर माफीनामा

पुणे प्रतिनिधी – महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर राज्यातून संतापाची लाट उमटली असतांनाच, शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


पोलिस बंदोबस्त असूनही काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली आहे. चंद्रकांत पाटील हे चिंचवड गावात मोरया गोसावी महोत्सवासाठी हजर झाले आहेत. त्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली आहे. घटनेनंतर शाईफेक करणार्‍याला चंद्रकांत पाटील यांचया कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. यावेळी सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. तेव्हा त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा सुरु करायच्या आहेत, पैसे द्या. तेव्हाच्या काळात लोकांनी 10 रुपये दिले. आता 10 कोटी देणारे लोक आहेत असे वक्तव्य त्यांनी केले. पैठणमध्ये एका सभेला संबोधीत करताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

झुंडशाही सहन करणार नाही- चंद्रकांतदादा पाटील

अरे काय चाललंय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला एका अर्थाने त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे जपले की एखाद्या गोष्टीचा विरोध हा लोकशाही मार्गाने करायचा, पण ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही, असा संताप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाईफेक प्रकरणानंतर व्यक्त केला. या शाईफेकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. पण ही झुंडशाही चालणार नाही. आज समजा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छूट दिली असती तर हे केवढ्यात पडले असते? पण आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS