Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगरीत शाहिरी महोत्सवाचे आयोजन

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बुधवार दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२५

’लिव्ह इन’चा हट्ट धरणार्‍या तरुणीची हत्या
बहुजन समाज पार्टीच्यावतीने इफ्तार पार्टी
बसखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू ; संगमनेर बसस्थानकावरील घटना

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बुधवार दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वा. माऊली सभागृह येथे शाहिरी महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली. 

या शाहिरी महोत्सवाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री, ॲड. आशिष शेलार यांची आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. सांस्कृतिक कार्य संचालनालय संस्कृतीचे जतन व संवर्धन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शाहिरी व संगीतावर आधारित असा भव्य सांस्कृतिक महोत्सव येत्या १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी, २०२५ दररोज सायंकाळी ७:०० वाजता माऊली सभागृह, अहिल्यानगर, येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या प्रथम पुष्पात दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शाहीर शिवाजी शिंदे, अहिल्यानगर यांच्या पोवड्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर शाहीर विजय पांडे, अकोला व शाहीर तुकाराम ठोंबरे, बीड यांचे सादरीकरण होईल.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या शाहिरी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अहिल्यानगर येथील शाहीर शिवाजी शिंदे, अकोला येथील शाहीर विजय पांडे व बीड येथील शाहीर तुकाराम ठोंबरे आणि सहकाऱ्यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता युवा शाहीर गणेश ताम्हाणे रायगड, शाहीर अनिता खरात सांगली व शाहीर विजय तनपुरे अहिल्यानगर यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी युवा शाहीर शुभम अवधूत विभुते सांगली, शाहीर शीला लोंढे कोल्हापूर व शाहीर मोहन गणपती यादव सांगली यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. 

हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील शाहिरी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चवरे वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS