Homeताज्या बातम्यामनोरंजन

शाहरुखच्या ‘डंकी’ च्या कमाईत मोठी घसरण

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा  'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसा

माजलगाव नगर परिषदेची कारवाई सुरू
 मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे 
भाजपने नाविन्यपूर्ण योजनांतून केला देशाचा विकास ः आमदार मोनिका राजळे

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा  ‘डंकी’ हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. वर्षातला शाहरुखचा हा तिसरा सिनेमा असून या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण डंकी हा सिनेमा ‘जवान’ आणि ‘पठाण’ या सिनेमांसारखी कमाई करण्यात कमी पडला आहे ‘डंकी’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला 29.2 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी आणि चौथ्या दिवशी 31.5 कोटींची कमाई केली. तसेच पाचव्या दिवशी या सिनेमाने 22.50 कोटींची कमाई केली. 

शाहरुख खानचा ‘डंकी’ हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर 22 डिसेंबर 2023 रोजी प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने आहेत. पण ‘डंकी’ पेक्षा ‘सालार’ने सर्वाधिक कमाई केली आहे. त्यामुळे ‘सालार’च्या रिलीजचा डंकीला मोठा फटका बसला आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत ‘डंकी’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. रिलीजच्या पाच दिवसांत जगभरात या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 206 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘डंकी’ या सिनेमाचं एकीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र काही प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला नसल्याचं दिसत आहे.

COMMENTS