Homeताज्या बातम्यामनोरंजन

शाहरूख खानचा अमेरिकेत अपघात

शुटिंगदरम्यान झाली गंभीर दुखापत

मुंबई/प्रतिनिधी ः बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एका शूटिंगदरम्यान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले असून, या अपघातात

शाहरुख खान आणि सलमान खान येणार पुन्हा एकत्र ?
शाहरुख खानचा बर्थडे होणार स्पेशल
शाहरुख खान लवकरच आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार

मुंबई/प्रतिनिधी ः बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एका शूटिंगदरम्यान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले असून, या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर लॉस एंजेलिसमध्येच तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली आहे. सेटवर झालेल्या दुखापतीमुळे शाहरुखच्या नाकातून रक्त येऊ लागले, त्यानंतर रक्तस्त्राव थांबण्यासाठी त्याचे ऑपरेशन करावे लागले.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यातील एका भागाच्या शूटिंगसाठी तो लॉस एंजेलिसमध्ये पोहोचला होता. या शूटिंग दरम्यान घडलेल्या अपघातात शाहरुख खान याच्या नाकाला दुखापत झाली. त्याच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच, रक्तस्त्राव थांबण्यासाठी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. आता डॉक्टरांनी शाहरुख खानच्या तब्येतीची माहिती दिली असून, काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे. दुखापत फार गंभीर नसली तरी, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी अभिनेत्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागली आहे. ऑपरेशननंतर शाहरुखच्या नाकावर पट्टी लावण्यात आली आहे. या अपघातानंतर शाहरुख आता भारतात परतला असून, तो या दुखापतीतून सावरत आहे.

COMMENTS