Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्यातील तीव्र पडसाद नाशिक मध्येही

स्वराज्य संघटनेसह मराठा मावळे आक्रमक

नाशिक प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा नाशिक शहरात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र नि

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ होतोय व्हायरल! | LOKNews24
कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकार्‍यांनी केली तपासणी
राकेश टिकैत यांची किसान युनियुनमधून हकालपट्टी

नाशिक प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा नाशिक शहरात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या शिवतिर्थ तथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळासमोर आज सकाळी कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावेत, अशी मागणी केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच उद्या राज्यव्यापी बंद ठेवण्याचा निर्णय देखील सर्वानुमते घेण्यात येणार आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यभरातल्या मराठा समन्वयकांची बैठक होणार असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल हिंदू समाज नाशिक च्या वतीने आज आंदोलन करण्यात येत असून यावेळी मोठ्या संख्येने क्रांती मोर्चा, नाशिक तसेच सकल हिंदू समाज, स्वराज्य संघटनेचे नाशिकमधील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रा. राजू देसले यांनी सांगितले की, जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली गावात लाठीमाराची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते. 29 ऑगस्टपासून हे उपोषण आंदोलन सुरु होते मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांनी उपोषण मागे घेतले नाही. पोलिसांनी लाठीचार्ज केला. लहान मुले, महिला कुणालाही पाहिले नाही. प्रचंड लाठीचार्ज केल्यानंतर आम्ही शांत का बसायचे असेही सर्व मराठा आंदोलकांनी म्हटले आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून घटनेच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे.

यावेळी रुपेश नाडे, प्रा. राजू देसले आदिलसह काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विचार मांडले. यावेळी सचिन अहिरे, गौरव मोहिते, शुभम अहिरे, किरण मोहिते, भारत पिंगळे, रुपेश लाटे, उमेश शिंदे, पुंडलिक बोडके, राम खुर्दळ, आशीष हिरे, योगेश कापसे, सचिन शिंदे, हर्षद निगळ, नितीन दातीर, केशव गोसावी, अमित नडगे, ज्ञानेश्वर थोरात, मनोज पाटील, पुष्पा जगताप, सुलक्षणा भोसले, निशिगंधा पवार, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, मधुकर कासार आदी उपस्थित होते.

COMMENTS