Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सात मल्टीनिधी संस्थांनी गुंतवणूकदारांना फसवले…

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास, गुंतवणूकदारांना संपर्काचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी ः सात मल्टीनिधी आर्थिक संस्थांनी ठेवीदार व गुंतवणुकदारांना ज्यादा व्याजाचे आमीष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले व त्य

तुळजाभवानी मातेच्या कमानीमुळे राहुरीच्या वैभवात भर
बहिण माझी लाडकी योजनेत अजित पवार गटाची गोची
 समाजरक्षक पुरस्काराने प्रसाद सुरंजे  सन्मानित

अहमदनगर/प्रतिनिधी ः सात मल्टीनिधी आर्थिक संस्थांनी ठेवीदार व गुंतवणुकदारांना ज्यादा व्याजाचे आमीष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले व त्यांच्या रकमेचा मुदतपूर्तीनंतर परतावा न देता त्याची अफरातफर करून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल असूनयिा गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी की, शनीछत्र अर्बन जवळके मल्टीनिधी लिमिटेड, शनीछत्र अर्बन राहुरी मल्टीनिधी लि., शनीछत्र अर्बन मल्टीनिधी लि., श्रीओम शनीछत्र अर्बन मल्टीनिधी लि., टचलाईफ मल्टी ट्रेड प्रा.लि., अहमदनगर कुरीज प्रा.लि. व अहमदनगर अर्बन मल्टीपल निधी लिमिटेड यांच्या चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकांनी ठेवीदार व गुंतवणुकदारांना ज्यादा व्याजाचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मल्टीनिधी कंपनीत पिग्मी डिपॉझिट खाते, फिक्स डिपॉझिट खाते, वैयक्तिक बचत खाते, सदस्य रिकरिंग खाते, वैयक्तिक सिक्युरिटी डिपॉझिट खाते, एफडी अशा विविध खात्यांमध्ये गुंतवणूक करायला लावली व नंतर त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव करीत आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील कागदपत्रांसह गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या मल्टीनिधी कंपनींचे कोपरगाव शाखेसह अहमदनगर जिल्ह्यातील इतर कंपनीत गुंतवणूक केलेल्या साक्षीदार/गुंतवणूकदारांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेद्वारे घेतली जात आहे.

COMMENTS