कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील करंजी गावाला गुरुवार 16 मे रोजी वादळी वार्यासह अचानक आलेल्या मुसळधार पाऊस व गारांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील करंजी गावाला गुरुवार 16 मे रोजी वादळी वार्यासह अचानक आलेल्या मुसळधार पाऊस व गारांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून या वादळी वार्यामुळे करंजी परिसरातील शेतकर्यांचे व नागरिकांचे शासकीय पंचनाम्यानुसार जवळपास 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर महावितरण कंपनीचे व परिसरातील लहान मोठ्या झाडांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सदर परिस्थितीचे गांभीर्य बघता आमदार आशुतोष काळे यांनी वादळ शांत होताच अवघ्या आर्ध्या तासात करंजी व पढेगाव येथील वाड्यावस्त्यांवर भेटी देत नुकसानीची पाहणी करत तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असत्या त्यानुसार करंजी गावचे तलाठी सतीश गायके व तलाठी कार्यालयातील कर्मचारी कानिफनाथ आहेर यांनी लागलीच गावातील शेतकर्यांच्या झालेल्या शेतमालाचे, गाईच्या गोठ्यांचे, राहत्या घरांचे, शेड आदि स्थावर मालमत्तेच्या नुकसानीची प्रत्यक्षात पाहणी करत पंचनामा केले असता यात दत्तात्रय बबन कासार 40 हजार, नानासाहेब सहकारी आगवन 37 हजार 500 रूपये, ज्ञानदेव तात्याबा धनवटे 27 हजार 500 रूपये, सोमनाथ बबन बर्डे 25 हजार, चांगदेव पुंडलिक माळवे 12 हजार 500 रूपये, शहाबाई बबन कासार 22 हजार 500 रूपये, अविनाश लक्ष्मण भिंगारे दोन लाख रूपये, राजेंद्र तुकाराम धनवटे 45 हजार रूपये, विमल कचरू शिंदे 20 हजार रूपये, लिलाबाई रामदयाळ काबरा 10 हजार रूपये, लिलाबाई कारभारी शिंदे 53 हजार 500 रूपये, प्रभाकर दशरथ शिंदे दीड लाख रूपये, लक्ष्मीबाई कारभारी शिंदे 40 हजार रूपये तर राहुल कैलास भिंगारे 20 हजार रूपये असे एकूण अंदाजे 7 लाख 3 हजार 500 रुपयांचा फटका करंजी भागातील शेतकरी व नागरिकांना बसला असून लवकरात लवकर आम्हाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकरी नागरिकांनी केली आहे.
तब्बल 27 तासाने वीजपुरवठा सुरळीत – या वादळाने परिसरातील महावितरणचे उच्चदाब वीज पुरवठा करणारे 4 व लघुदाब वीज पुरवठा करणारे 12 पोल उन्मळून पडले होते तर 20 ते 25 ट्रान्सफार्मरच्या तारा तूटल्या होत्या त्यामुळे करंजी सह पढेगाव, आंचलगाव,ओगदी,शिंगणापूर नऊ चारी, बोलकी या गावांचा व वाड्यावस्त्याचा वीज पुरवठा खंडित झाला होता सदरचा वीज पुरवठा संवत्सरकर विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत बोंडखळ व त्यांच्या सहकार्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवस रात्र मेहनत घेत तब्बल 27 तासानंतर सर्वत्र सुरळीत केला.
झाडांचे अतोनात नुकसान – करंजी व परिसरातील लहान-मोठ्या जवळपास 300 हून अधिक झाडांना फटका बसला आहे तर कित्येक झाडे उन्मळून पडली आहे तसेच कॅनॉल च्या कडेला असलेले फटांगरे वस्तीजवळील 100 वर्षापूर्वीचे झाड उन्मळून पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS