Homeताज्या बातम्यादेश

अपघातात सात भाविकांचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील छतरपूरमधील घटना

छतरपूर ः उत्तरप्रदेशातील छतरपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ऑटोने ट्रकला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 6 जण जखमी असून, यातील

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी
PMPML च्या धडकेने तरुणाचा मृत्यू.

छतरपूर ः उत्तरप्रदेशातील छतरपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ऑटोने ट्रकला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 6 जण जखमी असून, यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले आहे. उर्वरित दोघांवर छतरपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग-39 वर कडारीजवळ मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झाला. मृतांमध्ये एक वृद्ध व्यक्ती आणि दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याचे प्रभारी वाल्मिक चौबे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील महोबा रेल्वे स्थानकावरून 13 भाविक ऑटोने बागेश्‍वर धामला जात होते. दरम्यान, चालक झोपला आणि ऑटो ट्रकला धडकला. छतरपूरचे एसपी आगम जैन यांनी सांगितले की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सर्व भाविक उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. या अपघातात दीड वर्षांची अंशिका आणि तिचे वडील जनार्दन यांचाही मृत्यू झाला.

COMMENTS