Homeताज्या बातम्यामनोरंजन

अलीबाबा दास्तान ए काबूल मालिकेचा सेट जळून खाक

मुंबई प्रतिनिधी - अलीबाबा: दास्तान-ए-काबूल'च्या सेटवरुन धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये या सेटवर एक भयंकर घटना घडली आणि आता

संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक वास्तवता अभ्यासने गरजेचे 
महावितरणची डिजीटायजेशनकडे वाटचाल : ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांचे प्रमाण वाढले
देवणी परिसरात चिंंचेतून मिळते रोजगार संधी

मुंबई प्रतिनिधी – अलीबाबा: दास्तान-ए-काबूल’च्या सेटवरुन धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये या सेटवर एक भयंकर घटना घडली आणि आता ५ महिन्यांनी आणखी एका घटनेने टीव्ही विश्वात खळबळ उडाली आहे. ज्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली होती, त्याच सेटला आग लागलाचे समोर आले आहे. मुंबईतील वसई याठिकाणी असणारा हा स्टुडिओ जळून खाक झाल्याची माहिती आहे. याचठिकाणी तुनिषाने गेल्या वर्षी तिच्या ‘अलीबाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान आत्महत्या केली होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या बाहेरील भजनलाल स्टुडिओला आग लागली आणि शनिवारी १३ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. पालघर जिल्ह्यात असणाऱ्या या भजनलाल स्टुडिओला शनिवारी रात्री उशिरा आग लागली होती, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान आगी लागण्याचे नेमके कारण काय असावे, याचा तपास केला जात आहे. मात्र ‘अलीबाबा’चा संपूर्ण सेट या आगीत उद्ध्वस्त झाला आहे.

COMMENTS