शिर्डी ( प्रतिनिधी )- मुंबई ते शिर्डी पायी चालत आलेल्या साईबाबांच्या पालखीत पदयात्रींच्या थकलेल्या पायांना दिलेली ही सेवा म्हणजे एक प्रकारे
शिर्डी ( प्रतिनिधी )- मुंबई ते शिर्डी पायी चालत आलेल्या साईबाबांच्या पालखीत पदयात्रींच्या थकलेल्या पायांना दिलेली ही सेवा म्हणजे एक प्रकारे भक्तीच आहे,देव कुठे भेटतो तर अशा थकलेल्या चेहऱ्यांमध्ये, सेवेसाठी समर्पित झालेल्या हातांमध्ये, आणि निःस्वार्थ भावनेत असे मत शिर्डी येथील जिल्हा उप माहिती कार्यालयाचे अधिकारी सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील श्री साई मंदिर ट्रस्टच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून दर रामनवमी उत्सवाला मुंबईहून येणाऱ्या पालखीतील पदयात्री यांच्यासाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येते.यासाठी वीस जनांची टीम सात दिवस अहोरात्र सेवा देण्याचे काम करत असते.रामनवमी उत्सवाच्या आठ दिवस अगोदर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून या उपक्रमाची सुरवात करण्यात येते.चालत असलेल्या पदयात्रींच्या पायाची तेल लावून मालिश करणे,पायाला जखम ,फोड आले असेल त्याठिकाणी डेटॉल,बेटाडाइन औषधाने स्वच्छ करून मलम पट्टी करणे आदीबरोबर प्राथमिक उपचार सेवा अखंडपणे सुरु असून यंदाच्या ११४ व्या रामनवमी उत्सवात साई मंदिर कोऱ्हाळे ट्रस्टचे २५ वे वर्ष होते.या पंचवीस वर्षात त्यांनी साधारणपणे अडीच लाखाहून अधिक पदयात्री साईभक्तांची पायाची मालिश करून देण्याची सेवा केली आहे. यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने पंचवीस वर्ष अनमोल सेवा देणाऱ्या सेवेकरींचा शिर्डी जिल्हा उप माहिती कार्यालयाचे अधिकारी सुरेश पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रामकृष्ण लोंढे,बाळासाहेब सोनवणे,दिलीप खरात, राजेश जाधव, धनंजय वाकचौरे आदींसह साई सेवक पालखीचे मोहन खरपे, साई मंदिर कोऱ्हाळे चे वसंत खरात,हेमाताई घोडे,कु नंदिनी घोडे आदीसह साईभक्त उपस्तित होते.यावेळी साई मंदिर कोऱ्हाळे ट्रस्टचे संचालक सदानंद घोडे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि,पदयात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक किंवा सामाजिक प्रवास नसतो, तर तो मन, शरीर आणि आत्म्याचा परस्पर जोडणारा एक अद्वितीय प्रवास असतो.अशा पदयात्रेत शेकडो किलोमीटरचा प्रवास करताना पाय थकतात, शरीर थकते, पण मन मात्र निर्धाराने भरलेले असते. या थकव्याच्या क्षणी जर कोणीतरी प्रेमाने, आपुलकीने पाय दाबून सेवा केली, तर त्या सेवेमुळे केवळ शरीर नव्हे तर अंतःकरणही हलके होते.थकलेल्या पायांना आधार देणं, दुखलेल्या मनाला समजून घेणं हाच खरा मानवतेचा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.तर पत्रकार श्री लोंढे म्हणाले कि आजच्या धावपळीच्या युगात अशी सेवा करणारे हात फारच दुर्मीळ झाले आहेत.म्हणूनच या अनुभवाने मला हे शिकवलं की आपणही शक्य तितक्या लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे.कधीकधी एखाद्याच्या थकलेल्या पायांवर हात ठेवून दिलेली उब त्याच्या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकते.असे सांगत पुढील वर्षी आम्ही देखील या शेवट सहभागी होणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले.
COMMENTS