नेवासाफाटा : चौर्यांशी लक्ष योनी पार करतांना एका योनीत कोटीचा फेरा घ्यावा लागतो तेव्हा मनुष्य देह मिळत असतो. मनुष्य जीवन फलदायी होण्यासाठी माताप

नेवासाफाटा : चौर्यांशी लक्ष योनी पार करतांना एका योनीत कोटीचा फेरा घ्यावा लागतो तेव्हा मनुष्य देह मिळत असतो. मनुष्य जीवन फलदायी होण्यासाठी मातापित्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करा, आपल्याला जग दाखविणार्या आईवडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करा असे आवाहन नेवासा येथील देवी भागवत कथाकार हभप साधनाताई महाराज मुळे यांनी केले.
नेवासा येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार स्वर्गीय विनायकराव धस यांच्या स्मृती प्रित्यर्थ नेवासाफाटा येथील सावतानगर येथे आयोजित संतपूजन सोहळा कार्यक्रमात हभप साधनाताई मुळे हया बोलत होत्या. यावेळी कार्यक्रम संयोजक नितीन धस, सचिन धस, संगिता साळवे, सुवर्णा उदामले यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या प्रवचन प्रसंगी बोलतांना हभप सौ.साधनाताई मुळे म्हणाल्या की पूर्वजांचे स्मरण व त्यांचे संस्कार रहावेत म्हणून मुलांनी चांगले आचरण करणे हे गरजेचे असते या सत्कर्माने पुण्य मिळते,केलेल्या सत्कर्मामुळे व अन्नदानाने पितरांसाठी सदगती मिळते, आपण हे सत्कर्म कधी करता याची ते वाट ते पहात असतात, देव ऋण, ऋषि ऋण व माता पित्याचे ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करा, ऋषि मुनी संत ग्रंथ हे मार्ग दाखवतात म्हणून आपल्या ग्रंथ पुराणाचे शास्त्र याचे आचरण करा, रेल्वे शरीर शास्त्र रूळ आहे, शास्त्र सोडले तर जीवनात दुःख येते, कार्य श्रेष्ठ होण्यासाठी शास्त्रानुसार वागण्याचा प्रयत्न करा, आईवडील हेच खरे तीर्थ शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करा,अन्नदान करून पाणपोई उभारून जीवनात समाज ऋणफेडण्यासाठी प्रयत्न करा असे त्यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त नायब तहसीलदार बन्सीभाऊ साळवे, समाज प्रबोधनकार सतिष मुळे, गोरख साळवे, मनोजकुमार उदामले, रामेश्वर गावडे, दीपक परदेशी, संतोष भागवत, दिलीप दळवी यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. नितीन धस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS