Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालकाच्या घरी चोरी करणारा नोकर जेरबंद

चोरेलेले चार तोळयाचे सोन्याचे दागिने केले जप्त

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुरुवार दि 14 डिसेंबर रोजी रितेश मदनलाल बडजाते रा.कालेमळा, कोपरगाव यांनी त्यांचा  घरी कामाला असलेल्या

हिंद सेवा मंडळावर आले चार नवे चेहरे
पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित ; फुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका
प्राचार्य डॉ. ढाकणे यांचा सेवागौरव समारंभ उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुरुवार दि 14 डिसेंबर रोजी रितेश मदनलाल बडजाते रा.कालेमळा, कोपरगाव यांनी त्यांचा  घरी कामाला असलेल्या नोकराने त्यांचा घरातील 1 लाख 39 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने चोरी केले असले बाबत तक्रार दाखल केली होती. त्यावरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.रजि नंबर 587/2023 भा.द.वि. कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल करत. सदर गुन्हयाचा तपासकामी पोलीसांनी फिर्यादी यांचा नोकर रुपेश सुनिल कोपरे रा. संजयनगर, कोपरगाव यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिकची विचारपुस केली परंतु तो सुरवातीला उडवाउडवीचे उत्तरे देत होता त्यामुळे पोलिसांनी त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक केली आहे.
तर त्याचेकडून 30 हजार रुपये किंमतीचे दोन तोळयाचे सोन्याचे ब्रेसलेट तर 30 हजार रुपये किंमतीचे  दोन तोळयाची सोन्याची चैन असा एकूण 60 हजार रुपयेचा मुद्देमाल फिर्यादीच्या घरातील नोकर रुपेश सुनिल कोपरे याचेकडुन हस्तगत केला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक प्रदिप देशमुख, पोउपनि रोहीदास ठोंबरे, भरत दाते, पोहेकॉ बाबासाहेब कोरेकर, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ सुशिल शिंदे, पोकॉ बाळासाहेब धोंगडे, पोकॉ राम खारतोडे, पोकॉ विलास मासाळ यांनी केली आहे तर  सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बी एस कोरेकर हे करीत आहेत.

COMMENTS