Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड

पुणे : तृतीयपंथीयांना समाजात कायम अवहेलना सोसावी लागते. त्यांना आरोग्य सुविधा देण्याबाबतही फारसे प्रयत्न केले जात नाहीत. हे चित्र सगळीकडे दिसते.

मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याच्या यशानंतर पाथर्डी शहरासह तालुक्यात  जल्लोष
जेऊर कुंभारी गावठाण जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच
पायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे : राजेश टोपे

पुणे : तृतीयपंथीयांना समाजात कायम अवहेलना सोसावी लागते. त्यांना आरोग्य सुविधा देण्याबाबतही फारसे प्रयत्न केले जात नाहीत. हे चित्र सगळीकडे दिसते. या सर्व गोष्टींना छेद देत ससून सर्वोपचार रुग्णालयाने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे. पुढील काळात इतरही रुग्णालयांकडून ससूनचे अनुकरण होण्याची शक्यता आहे.ससून रुग्णालयातील नवीन 11 मजली इमारतीत हा वॉर्ड आहे. त्याचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या वॉर्डमध्ये 24 बेड असून, दोन अतिरिक्त आयसीयू बेड आहेत. तृतीयपंथीयांवर उपचार करण्यास अनेक रुग्णालये नकार देतात. मात्र त्यांना ससूनमध्ये अतिशय सहजपणे उपचार मिळणार आहेत. या वॉर्डमधील कर्मचार्‍यांना संवेदनशीलपणे वागण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तृतीयपंथीयांना भेडसावणार्‍या आरोग्य समस्यांवर उपचाराची नवी दिशा ससूनमुळे खुली झाली आहे. पुढील काळात इतरही रुग्णालयांकडून ससूनचे अनुकरण होण्याची शक्यता आहे.

COMMENTS