Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषीदिनी राज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ शेतकर्‍यांचा सत्कार

लातूर प्रतिनिधी - येथील राज प्रतिष्ठानच्या वतीने कृषीदिन तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वाठवडा येथे 11 ज्य

अनैतिक संबंधातून मित्राच्या सहाय्याने प्रियकराच्या वडिलांची हत्या .
मृत्यूचे तांडव ; वीज अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू, दोन जखमी | LOK News 24
शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही.

लातूर प्रतिनिधी – येथील राज प्रतिष्ठानच्या वतीने कृषीदिन तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वाठवडा येथे 11 ज्येष्ठ शेतक-यांचा मराठमोळा फेटा बांधून सत्कार करण्यात आला व त्यांनी दिलेल्या कृषीविषयक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत होते. प्रतिष्ठानचे सदस्य अण्णा पाटील, दिलीप राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सर्वांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रातिनिधीक रुपात शेतकर्‍यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांच्या काळातील शेतीविषयक अनुभव सांगितले. गावातील ज्येष्ठ शेतक-यांच्या वाट्याला असा सन्मान अभावानेच येतो; परंतु आमच्या योगदानाची जाणीव ठेवून राज प्रतिष्ठानने तो केला याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सत्कारमूर्तींनी गावातील युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आली व सत्कारमूर्तींनी त्यास होकार भरला.

COMMENTS