Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावबंदी करणार्‍याला तुरुंगात पाठवा : ना. भुजबळांनी सांगितली कायद्यातील तरतूद

हिंगोली / प्रतिनिधी ः हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा झाला. राज्यातील ओबीसींचे दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांनी प

महाविकास आघाडी आहे… एकमेकांचा सन्मान राखा…
‘छगन भुजबळ ‘ओबीसी आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, असे ओरडत फिरतात… मात्र सरकार असूनही काही करू शकले नाही
येवला उपजिल्हा रुग्णालयात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सी. टी. स्कॅन मशीनचे लोकार्पण संपन्न

हिंगोली / प्रतिनिधी ः हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा झाला. राज्यातील ओबीसींचे दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा गावबंदीच्या फलकबाजीवरुन मराठा समाजाला फटकारले आहे.

ना. छगन भुजबळ म्हणाले, घटनेतल्या कलम 19 वरुन कुणालाही कुठेही संचार करण्याची मुभा आहे. जर कुणी गावबंदी केली किंवा अडवले तर त्याला एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. असे कुणी करत असेल तर त्याला तुरुंगात पाठवा, असे आवाहन भुजबळ यांनी केले. रोहित पवार, राजेश टोपे यांचे गावात स्वागत होते आणि दुसरीकडे दानवेंना गावबंदी असते, असे का? मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतू ओबीसींमधून देऊ नका. जाळपोळ करणार्‍या झुंडशाहीला आमचा विरोध आहे. मराठा समाजाने 85 टक्के सरकारी नोकर्‍या मिळवल्या आहेत. इतर सुविधाही त्यांना मिळतात. काही ठिकाणी ओबीसी समाजापेक्षा जास्तीच्या सुविधा त्यांना मिळतात. त्या सुविधा ओबीसी समाजाला मिळाल्या पाहिजेत. जे सारथीला मिळते, ते ओबीसींना मिळाले पाहिजे. यासाठी ओबीसी नेत्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. माझ्याकडे नेतृत्व द्या किंवा नका देऊ. तुम्हीच पुढे व्हा, हा लढा सुरु ठेवा. परंतू आपल्यातील मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. असे म्हणत भुजबळांनी ओबीसी नेत्यांनाही फटकारले.

COMMENTS