Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’देशहितवादी’वर रविवारी परिसंवाद व विद्यार्थी गुणगौरव सोहळा

श्रीरामपूर ः शिरसगाव येथील वार्ड नं.1 मधील बोरावके नगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठाननतर्फे सुखदेव सुकळे लिखित चरित्र चिंतनपर ’देशहितवादी’ ग्रं

LokNews24 l फोन टॅपिंग करून सरकारचा डाव उलटला
कोपरगाव नगरपरिषदेने दिली स्वच्छतेची शपथ
एसबीसी प्रवर्गाच्या साप्ताहिक आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

श्रीरामपूर ः शिरसगाव येथील वार्ड नं.1 मधील बोरावके नगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठाननतर्फे सुखदेव सुकळे लिखित चरित्र चिंतनपर ’देशहितवादी’ ग्रंथावर परिसंवाद, स्व. पुष्पाताई सुकळे यांची 73 वी जयंती, सुखदेव सुकळे यांचा 77 वा वाढदिवस,कवयित्री संगीता फासाटे यांचे वडील चंद्रभान मोहन फासाटे यांचा अमृतमहोत्सवी 75 वा वाढदिवस व साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा 67 वा वाढदिवस तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दि. 02 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.
श्रीरामपूर वार्ड नं.01, बोरावके नगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान प्रांगणात आयोजित केलेल्या’ ’देशहितवादी’ ग्रंथाच्या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य टी.ई. शेळके तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष,पत्रकार प्रकाश कुलथे उपस्थित राहणार आहेत. परिसंवाद वक्ते म्हणून संगमनेर येथील प्रा. बाबा खरात हे’ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात’, कोपरगाव येथील सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे हे’ शिक्षण तपस्वी अ‍ॅड, रावसाहेब शिंदे’, माळेवाडी येथील प्रयोगशील, प्रगतीशील शेतकरी सुदामराव औताडे पाटील हे ’कृषिक्रांतीचे सेनानी डॉ. अण्णासाहेब शिंदे’ यांच्यावर व्याख्याने देणार आहेत. याप्रसंगी 10 वी,12 वी परीक्षेत विशेष .गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या विविधदर्शी सोहळ्यास उपस्थित राहवे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, कार्याध्यस प्राचार्य टी.ई. शेळके, संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, उपाध्यक्ष, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये, खजिनदार सुयोग बुरकुले यांनी केले.

COMMENTS