Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरदार वाईन शॉप मध्ये जादा दराने दारू विक्री, व ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक

परळी प्रतिनिधी -  परळी शहरात सरदार वाईन शॉप मोंढा भागात सुरू असून त्या ठिकाणी सर्रासपणे म्हणजेच एमआरपी पेक्षा जास्त किंमत घेऊन विदेशी दारू विक्री

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक
7 गावठी कट्टे…8 काडतुसे…3 तलवारींसह 14 जण ताब्यात; श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यांमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन
बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले

परळी प्रतिनिधी –  परळी शहरात सरदार वाईन शॉप मोंढा भागात सुरू असून त्या ठिकाणी सर्रासपणे म्हणजेच एमआरपी पेक्षा जास्त किंमत घेऊन विदेशी दारू विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे दारू पिणार्‍यांना याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या सरदार वाईन शॉप चे लायसन रद्द करावे अशी मागणी केली जात आहे. या ग्राहकांना भुर्दंड  सोसत आहे. शासन निर्णयाप्रमाणे ज्यांच्याकडे लायसन आहे अशांनाच दारू विक्री करण्याची परवानगी आहे, परंतु सर्रासपणे ज्यांच्याकडे लायसन नाहीत अशा व लहान मुलांना देखील या वाईन शॉप  मालकाकडून वाईन विक्री केली जात आहे, तात्काळ या सरदार वाईन शॉप चे लायसन रद्द करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी एका ग्राहकाने केली. आहे याची उच्चस्तरीय चौकशी व सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करा. हा प्रकार एका ग्राहकाबरोबर काल रात्री आठच्या दरम्यान झाला, अजादा पैसे कशाचे विचारले असता ते आम्हाला माहित नाही तुम्ही मालकाला विचारा असे अरे रवीची व उद्धटपणाची भाषा ग्राहकांसोबत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सरदार वाईन शॉप चे लायसन रद्द करावे यांच्यावर योग्य कारवाई करा अशी मागणी ग्राहकाने केली आहे. सदर वाईन शॉप येथून जी दारू विकत घेतली त्याचे पुरावे म्हणून बॉटल्स टाकण्यात आले आहेत त्याचा बॅच नंबर व मॅन्युफॅक्चरिंग डेट यावरती आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की ही दारू सरदार वाईन शॉप इथूनच घेतली आहे.तरी संबंधित वरिष्ठांनी या गोष्टीला गांभीर्याने घेऊन या वाईन शॉप विरोधात योग्य ती पावले उचलत अशी मागणी जोर धरत आहे.

COMMENTS