पुणे/प्रतिनिधी ः पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असणार्या शहरामध्ये बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेत विक्री करण्यात आल्याची माहिती समोर

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असणार्या शहरामध्ये बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेत विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या17 वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून कुंटणखान्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला बेकायदेशीररित्या भारतात आणून पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटखान्यात विक्री केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या गुन्ह्यात दोन महिलांसह तिघांचा सामावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. बांगलादेशातील तरुणी अल्पवयीन आहे. दलाल महिला मारिया उर्फ सोनी आणि एका नेपाळी पुरुषाने मुलीला पार्लरमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं. या मुलीला खोटे सांगून भारतात आणण्यासाठी तयार केले. त्यानंतर दोघांनी या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला बेकायदेशीररित्या भारतात आणले. या अल्पवयीन मुलीला दोघांनी बुधवार पेठेत आणून कुंटणखाना चालवणार्या डोलमा राजू तमांग या महिलेला विकले. त्यानंतर या तरुणीला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS