कोपरगाव तालुका ः पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक को
कोपरगाव तालुका ः पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी केबीपी विद्यालयाच्या परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर रॅलीची सांगता केबीपी विद्यालयात झाली.कमवा आणि शिका या माध्यमातून सुरू झालेली शिक्षणातून स्वावलंबन ही काळाची गरज आहे असे मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्था या नावातच रयत आहे.त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मोठे कार्य उभे केले.महाराष्ट्र आणि कर्नाटक इथवर रयत शिक्षण संस्थेचा विस्तार झाला आहे.अतिशय नामवंत शिक्षण संस्था म्हणून आज अभिमानाने रयत ओळखली जाते.लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून आजवर अनेक विद्यार्थी देश विदेशात उच्च पदावर विराजमान झाले आहे.स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी कर्मवीर अण्णांच्या शिक्षण प्रसाराला गतिमान करण्यासाठी मोठे काम रयत शिक्षण संस्थेत केले.उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आदर्श कारभार केला व संस्था वाढीसाठी मोठे योगदान दिले जी आमच्यासाठी प्रेरणा आहे.शिक्षण आणि त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उच्चशिक्षणाच्या कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात कोल्हे साहेबांनी वाटा निर्माण केल्या.कर्मवीर अण्णांचा शिक्षण क्रांतीचा विचार अतिशय समर्पक भावनेने कोपरगाव तालुक्यात देखील जपला गेला.रयत शिक्षण संस्थेच्या विकासात्मक वाटचालीत स्व.शंकरराव कोल्हे आणि स्व.शंकरराव काळे यांची मोलाची साथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना लाभली ही आपणा सर्वांसाठी एक प्रेरणादायी आठवण आहे असे विवेक कोल्हे म्हणाले. संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कर्मवीर जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात निघालेल्या कर्मवीर रॅली मद्ये सहभागी हजारो विद्यार्थी विद्यार्थिनीना सुंगंधी दूध वाटप करण्यात आले.
COMMENTS