Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ मॅरेथॉनचे आयोजन

संगमनेर ः मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू उद्योगपती स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता लायन्स क्लब संगमनेर

प्रा. सोनाली हरदास-जेजुरकर यांना पीएच.डी. प्रदान
नगरच्या स्वामी समर्थ मठात उद्यापासून धार्मिक उपक्रम
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

संगमनेर ः मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू उद्योगपती स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता लायन्स क्लब संगमनेर तर्फे येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी विनामुल्य आहे. संगमनेर मधील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, युवक युवती, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लायन्स क्लब संगमनेरचे संस्थापक अध्यक्ष व मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांनी केले आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेत 7 किलोमीटर व 10 किलोमीटर अश्या दोन प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या प्रत्येक स्पर्धकाला मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित केले जाणार आहे. 7 किलोमीटरमध्ये नाशिक रोडवरील मालपाणी लॉन्सपासून ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज ते पुन्हा सह्याद्री कॉलेज असा मार्ग  असेल तर 10 किलोमीटरमध्ये बस स्थानक ते अमृतवाहिनी कॉलेज ते पुन्हा हॉटेलकाश्मीर टी सेंटर असा मार्ग असणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार असून सर्व वयोगटातील मुले मुली महिला पुरुष सहभागी होऊ शकतात. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी करण्याचे आवाहन लायन्स क्लब सफायर संगमनेरतर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS