Homeताज्या बातम्यासंपादकीय

आत्म अहंकाराने पछाडलेल्यांनी स्वतःला तपासावे !

राधेश्याम मोपलवार हे एक नेक्सस आहेत, हे काल आम्ही आपल्या लक्षात आणून दिले. त्यांनी प्रशासन सांभाळल्यापासून त्यांच्यामागे एकच लकडा आहे, तो म्हणजे

सत्ताधारी जातवर्ग आरोपांच्य छायेत !
दुसऱ्या फेरीचे मतदान आणि काॅंग्रेस मॅन्युफॅस्टो ! 
सत्ताबदल की सरंजामदारीची मजबूती ?

राधेश्याम मोपलवार हे एक नेक्सस आहेत, हे काल आम्ही आपल्या लक्षात आणून दिले. त्यांनी प्रशासन सांभाळल्यापासून त्यांच्यामागे एकच लकडा आहे, तो म्हणजे त्यांची सर्वस्तरीय चौकशी केली जावी याचा! मात्र, होते उलटेच; त्यांच्या काळ्या कृत्यांची सप्रमाण पुराव्यांसह, त्यांच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांनाच उलट आपल्या जागा सोडाव्या लागतात. मुद्रांक जिल्हाधिकारी, एम‌आयडीसी संचालक, एम‌एस‌आरडीसी संचालक, चीफ मिनीस्टर वाॅररूम प्रमुख अशा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रशासक म्हणून कार्य केले; त्या सर्वच ठिकाणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा तर आरोप झालाच, पण, कधी मित्राला फसविण्यासाठी त्याच कुटुंब उद्ध्वस्त करणं, मुद्रांक घोटाळ्याचा जन्मदाता म्हणून त्यांच्यावर आरोप होणं, एका डिटेक्टिव सोबत फौजदारी गुन्ह्यात शोभेल असं कृत्य करणं, एवढंच नव्हे, तर, महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा प्रकल्पाच्या नावाने थैट कुटुंबाची वैयक्तिक मालमत्ता म्हणून हडप करणे, या सगळ्या प्रकारातून एक प्रशासक गुन्हेगारी जगताचा एक भाग राहुनही नामानिराळा राहतो, हे त्याहून भीषण आहे. खरेतर, त्यांच प्रशासकीय जीवनातील कार्य हे एखाद्या जन‌आंदोलनाकडून विरोधाचा भाग झाला नाही, हे एक नवलच म्हणावं लागेल. नेक्सस हा कोणत्याही परिस्थितीत  जनविरोधी असतो. सध्या उद्योजक किंवा काॅर्पोरेट जग यांच्यात एक नेक्सस निर्माण झाल्याचे लोकशाही सभागृहामध्ये मांडले जाते.

परंतु, अधिकाऱ्यांनी चालविलेला नेक्सस हा अधिक भीषण म्हणायला हवा.कारण, प्रशासनातील अधिकारी हे एकप्रकारे सत्तापदावर असतात. त्यांच्याकडे सुपूर्द केलेला विभागाची संपूर्ण माहिती आणि अधिकार त्यांच्याकडे असतात. विभागाची असलेली माहिती आणि अधिकार जनहितार्थ वापरला नाही तर, नेक्सस चा जन्म होतो. नेक्सस ही जनतेची सर्वस्तरीय लूट तर असतेच पण, जनतेचा तो विश्वासघात ही असतो. अशा विश्वासघात करणाऱ्या अधिकाऱ्यांची परंपरा रोखायलाच हवी; त्याशिवाय लोक कल्याणाचे ध्येय असणारे अधिकारी निर्माण होवू शकत नाही; अधिकाऱ्यांच्या या नेक्सस ची पुढची पिढी किंवा पायरी किती भीषण असेल, हे नुकत्याच सुरू असलेल्या पूजा खेडकर प्रकरणात आपल्याला दिसतेच आहे. लोकशाहीतील लोकदबाव सत्ता आणि प्रशासन मानायलाच तयार नाही; म्हणून लोकशाही व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होवू पाहतो आहे. शिवाय लोक दबाव उलट्या पध्दतीने उभा केला जाऊ लागला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलक जरांगे पाटील यांची रोजची वक्तव्य आणि त्यांच्या लोकशाही विरोधी वक्तव्यांपुढे लोटांगण घालणारे! काल जरांगे पाटील म्हणाले की, मराठा अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्यांना बघून घेऊ.

वास्तविक, प्रशासनातील अधिकारी हा देशाच्या संविधानानुसार सार्वजनिक अधिकारी असतो. संविधानानुसार पद आणि गोपनीयतेची शपथ त्याला दिलेली असते. त्यानुसार अधिकारी हा लोकांचा सेवक असतो. ज्यांची नियुक्तीच लोकांच्या कार्यासाठी झाली आहे, त्यांनी एका जातीचेच काम करायचे, असे जरांगे सुचवू इच्छितात काय? यासंदर्भात, जरांगे पाटील यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक नेते पुरूषोत्तम खेडेकर यांच्या कार्याचा इतिहास पहावा. खेडेकर हे मराठा समाजातील असूनही प्रशासनात त्यांनी सर्व समाजातील बांधवाचे काम निस्पृहपणे केले. बहुजन विचारधारा स्विकारून शासकीय सेवेत असतानाही जहाल विचार मांडणाऱ्या पुरूषोत्तम खेडेकर यांचा चाहता वर्ग सर्व समाजस्तरात निर्माण झाल्याने, ते आजही महाराष्ट्रात एक लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. आमचे त्यांच्याशी गेल्या चार दशकांचे संबंध आहेत. विचारांनी सडेतोड असणाऱ्या खेडेकर साहेबांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती जरांगे पाटील यांच्यापेक्षा अधिक आहे. आजही गावागावात त्यांना मानणारा वर्ग आहे. एक गोष्ट जरांगे पाटील यांनी लक्षात घ्यावी की, सामाजिक आंदोलनात कित्येक लोकांचे आयुष्य झिजले. त्यात पुरूषोत्तम खेडेकर यांचाही समावेश होईल. मराठा आरक्षण प्रश्नावर लाखोंच्या सभा त्यांच्याही झाल्या; त्या सभांची गर्दी त्यांच्या डोक्यात कधी गेली नाही. यानिमित्ताने आमचा सल्ला एवढाच राहील की, आत्म अहंकाराने पछाडलेल्या लोकांनी एकदा स्वतःला तपासून पहायला हवे!

COMMENTS