अकोले ः अकोले तालुक्यातील कळस बु येथील माजी सैनिक विठ्ठल भुसारी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय लिपिकपदी निवड झाली आहे. एम.प

अकोले ः अकोले तालुक्यातील कळस बु येथील माजी सैनिक विठ्ठल भुसारी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय लिपिकपदी निवड झाली आहे. एम.पी.एस.सी. मार्फत गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 च्यामध्ये मंत्रालय क्लर्क पदासाठी परीक्षा झाली होती. त्याचा नुकताच निकाल जाहीर झाला. यात भुसारी यांनी यश मिळवले. त्यांची राज्य राखीव पोलीस (एसआरपीएफ) अहमदनगर कुसडगाव व मुंबई पोलिसमध्ये ही निवड झाली असून महाराष्ट्र शासन नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी या पदाची परीक्षा दिलेली असून निकाल लवकरच जाहीर होईल. विठ्ठल भुसारी हे शेतकरी कुटुंबातील असून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते कळस येथील जयकिसान सह दूध संस्थेचे माजी चेअरमन बाळासाहेब भुसारी यांचे ते चिरंजीव आहेत. भारतीय सैन्य दलात असताना देशाची सेवा प्रामाणिक पणे केली. त्याचे फळ या परीक्षेत मिळाले असल्याचे विठ्ठल भुसारी यांनी सांगितले.
COMMENTS