Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिक्रमा कॉलेजच्या संघाची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

श्रीगोंदा: परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी येथे झालेल्या तालुकास्तरीय मुले-मुली शालेय फुटबॉल स्पर्धेत परिक्रमा सायन्स कॉलेजच्या 17 वर्ष वयोगटातील

अधिकारवाणीने आपली कामे सांगा ः खा. निलेश लंके
रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
 सिद्धार्थनगर येथे भरदिवसा  घरफोडी

श्रीगोंदा: परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी येथे झालेल्या तालुकास्तरीय मुले-मुली शालेय फुटबॉल स्पर्धेत परिक्रमा सायन्स कॉलेजच्या 17 वर्ष वयोगटातील मुले संघाने द्वितीय क्रमांक तर 19 वर्ष वयोगटातील मुले, व 19 वर्ष वयोगटातील मुली या संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून कोपरगाव येथे होणार्‍या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार बबनरावजी पाचपुते, परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅड. प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.अनिल पुंड, अकॅडमी डायरेक्टर इंद्रायणी पाचपुते, अकॅडमी डेप्युटी डायरेक्टर प्रा. संजीव कदम पाटील, प्राचार्य संजीवन महाडिक, प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ, प्रा. डॉ.सुदर्शन गिरमकर, प्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्राचार्य डॉ.पांडुरंग इथापे, प्राचार्या डॉ. सुवर्णा निर्मळ, प्राचार्य जेम्स मेनन, यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.या खेळाडूंना प्रा. रवींद्र काळाने, प्रा.रोहन रंधवे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS