अहमदनगर ः आगामी ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवाद ऑस्ट्रेलिया येथे होणार आहे. दोन्ही देशांतील तरुण नेत्यांच्या विचारचे आदान-प्रदानासाठी हा संवाद आयोजित

अहमदनगर ः आगामी ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवाद ऑस्ट्रेलिया येथे होणार आहे. दोन्ही देशांतील तरुण नेत्यांच्या विचारचे आदान-प्रदानासाठी हा संवाद आयोजित करण्यात येत असतो. ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवाद ऑस्ट्रेलियात 17 ते 24 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. 2012 मध्ये स्थापन झालेल्या दोन्ही देशांमधील या द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांतील तरुण नेत्यांना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, शहरविकास अशा विविध मुद्दे मांडत असतात. या पूर्वी देखील अमेरिका व इंग्लंडच्या अभ्यास दौर्यासाठी आमदार सत्यजीत तांबेंची निवड झाली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियातील तरुणांमध्ये समज, सहयोग आणि स्थायी संबंध वाढवण्यासाठी -खधऊ हे एक व्यासपीठ महत्त्वाचे आहे. या संवादासाठी आ. तांबेंची निवड हे कौतुकास्पद आहे. प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील नेते दोन्ही देशांसमोरील आव्हाने आणि संधी शोधण्यासाठी एकत्र येतात असतात. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या भविष्याला आकार देण्यासाठी महत्त्वाचे आहे. नेतृत्व, मुत्सद्दीपणा, नवकल्पना आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर लक्ष केंद्रित करून, हा कार्यक्रम सर्व सहभागींसाठी एक चांगले व्यासपीठ आहे. ऑस्ट्रेलिया येथे होणार्या युवा संवादात, प्रतिनिधी लोकसंख्याशास्त्रीय बदलांपासून भविष्यातील उद्योगांपर्यंत, शेती आणि एआयसह यासह संपूर्ण जगावर परिणाम करणार्या अडचणी आणि नवीन संधींसाठी दोन्ही देश कसे सहकार्य करू शकतात याचा शोध घेणार आहेत. या संवादामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ, विचारवंत आणि मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल चर्चा, कार्यशाळा आणि संवादात्मक सत्रे असणार आहेत. ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी माझी निवड झाली आहे. माझ्यासाठी शिकण्याची ही खूप मोठी संधी आहे. या अभ्यास दौर्यात कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियाच्या संसदेत जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील शेतीकरी, स्टार्टअप करणार्या आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद करता येणार आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मदत होणार आहे, असे आ. तांबे म्हणाले.
COMMENTS