Homeताज्या बातम्यादेश

‘आयएएस’ पूजा खेडकरची निवड रद्द !  

‘यूपीएएसी’कडून कारवाई ; भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई

नवी दिल्ली ः वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. बुधवारी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने पूजा खेडकर

पूजा खेडकर दहा दिवसांपासून नॉट रिचेबल
अटकेची कारवाई टाळण्यासाठी पूजा खेडकर पळाली
वैद्यकीय शिक्षण घेतांना पूजा खेडकर फीट असल्याचे प्रमाणपत्र

नवी दिल्ली ः वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. बुधवारी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने पूजा खेडकर यांना दोषी ठरवत त्यांचे आयएएस पद काढून घेण्यात आले आहे. तसेच भविष्यात देखील त्यांना परीक्षा देण्यास मनाई करण्यात आले आहे. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.  
पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरांनी यूपीएससीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपीएससीने आता पूजा खेडकर यांचे पद काढून घेतले असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही. नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांची बाजू मांडण्यासाठी 30 जुलैपर्यंत वेळ देण्यात आले होते. त्यानंतर आता यूपीएससीने कारवाई केली. दरम्यान, पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला कोर्टात जामीनासाठी धाव घेतली. यावेळी बुधवारी न्यायालयात सुनावणी देखील झाली. या सुनावणीत पूजा खेडकर यांच्या वकीलांनी युक्तीवाद करतांना म्हटले की, पूजा यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करतांना गॅझेट नोटीफिकेशन जारी केल्याचा युक्तिवादही त्यांनी कोर्टात केला आहे. विशेषतः आपल्याला मिळालेले दिव्यांग प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डाने जारी केले आहे. त्यामुळे त्यात फसवणूक काय? असा कळीचा प्रश्‍नही पूजा खेडकर यांनी उपस्थित केला आहे. युक्तीवाद करताना खेडकरच्या वकिलांनी पूजा खेडकर फायटर आहे. यूपीएससीद्वारे प्रत्येक टप्प्यावर तिची उमेदवारी वैध करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला. अपंग व्यक्ती म्हणून कायदा आणि सुधारणा करूनही पूजा खेडकरचे जीवन सोपे नव्हते. तिला प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईसमोर जावे लागले असेही तिच्या वकिलांनी यावेळी कोर्टात म्हटले आहे.  पूजा खेडकर फायटर आहे. दर वेळी तिला परीक्षार्थी होण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. आम्ही 5 अटेम्प्ट चांगल्या हेतूने लिहिले होते. ती दिव्यांग आहे. तिचे आईवडील घटस्फोटीत आहेत. ती महिला आहे. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला. कारण ती दिव्यांग आहे म्हणून? ती महिला आहे म्हणून? असे प्रश्‍न देखील पूजा खेडकरच्या वकिलांनी उपस्थित केले आहेत. पूजा खेडकरवरील अटकपूर्व जामिनावर सुनावणी पार पडली. यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणीची मागणी पूजा खेडकरमार्फत करण्यात आलेली होती. पण, न्यायालयाने निर्णय देण्याआधीच यूपीएससीने पूजा खेडकरवर कारवाई करण्यात आल्याने आता पोलिस देखील पूजा खेडकरवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकरला अटक की जामीन? आज निर्णय – गेल्या 10 दिवसांपासून नॉट रिचेबल असणार्‍या पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला कोर्टात जामीनासाठी धाव घेतली. यावेळी बुधवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आपले दिव्यांग प्रमाणपत्र कोर्टात सादर केले. त्यात आपण 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने जामीन द्यायचा की नाही, याचा निर्णय राखून ठेवला असून, यावर निर्णय गुरूवारी 4 वाजता देण्यात येणार आहे.

अटकेस स्थगिती दिल्यास बचावाची संधी मिळेल – अ‍ॅड. माधवन यांनी न्यायालयात भक्कमपणे पूजा खेडकरची बाजू मांडताना अनेक खळबळजनक दावे केले. त्यांनी पूजा खेडकरची बाजू मांडताना म्हटले की, पूजा खेडकर हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता ते म्हणत आहेत की, माझी पोलिस कोठडीत चौकशी झाली पाहिजे. पण मी काय केले आहे? सरकारी यंत्रणांनी माझ्यावर गुन्हा दाखल करताना इतकी तत्परता का दाखवली. मला माझ्या बचावाची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी मिळाली पाहिजे, असे पूजा खेडकरने म्हटले आहे. मात्र यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केले आहे.

COMMENTS