Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीक्षा सोनवणेची अजिंक्य पद कुस्ती स्पर्धेसाठी निवड

अकोले ः पारनेर (भाळवणी) या ठिकाणी महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची अहमदनगर जिल्हा निवड चाचणी नुकतीच संपन्न झाली असून, यामध्ये राजूर येथील अ‍ॅड.

रुग्णालयांसमोरील गर्दी आता पोलिसांचे टार्गेट ; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले उपाययोजनांचे आदेश
औटेवाडी-खेड रस्त्याची दुरवस्था
निरपेक्ष पद्धतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करा

अकोले ः पारनेर (भाळवणी) या ठिकाणी महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची अहमदनगर जिल्हा निवड चाचणी नुकतीच संपन्न झाली असून, यामध्ये राजूर येथील अ‍ॅड. एम.एन देशमुख ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कु. दीक्षा शंकर सोनवणे(12 वी कॉमर्स) हिने 59 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सदर खेळाडूची पुणे (खराडी) येथे होणार्‍या महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धसाठी निवड झाली आहे. दीक्षा ही अकोले तालुक्यातील मुरशद या गावची रहिवाशी आहे अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या गवळी जे. बी यांनी दिली आहे.
दीक्षा ही भारतीय खेळ प्राधिकरण नव्वी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालय साई कुस्ती सेंटर मध्ये दोन वर्षापासून कुस्ती प्रशिक्षण घेत आहे.तिला विद्यालयातील शारिरीक शिक्षक विभाग प्रमुख प्रा.विलास नवले व कुस्ती केंद्राचे कोच आंतरराष्ट्रीय पदक विजेते तान्हाजी नरके,प्रा.रविंद्र कवडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.  तिच्या या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.मनोहरराव देशमुख, सचिव टी. एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,नागरिक आदींनी अभिनंदन केले.तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS