Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आसिया शेख हिची पोलिस दलात निवड

श्रीरामपूर : प्रवरानगर येथील महात्मा गांधी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आसिया अकील शेख हिची नुकतीच रायगड पोलीस दलात न

जनतेमधून सरपंच निवड होण्यासाठी पुन्हा कायदा अमलात आनण्याची सरपंच परिषदेची मागणी
मंजूर गावातून लाख रुपयेचा गांजा जप्त
गुरुवर्यांच्या हस्ते झालेला सत्कार सेवाकार्याला बळ देणारा

श्रीरामपूर : प्रवरानगर येथील महात्मा गांधी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आसिया अकील शेख हिची नुकतीच रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. तिच्या या निवडीप्रित्यर्थ प्रवरानगर येथील ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय अभ्यासू आणि कष्टाळू  आसियाने कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीत स्वतःच्या जिद्दवर मेहनत करून यश संपादन केले आहे. तिचे वडील प्रवरानगर येथे रिक्षा चालक आहेत. महात्मा गांधी संकुलाच्या वतीने उपप्राचार्य अलका आहेर, डॉ. शरद दुधाट, वर्गशिक्षक जवाहरलाल पांडे, ज्ञानदेव दवंगे यांच्या हस्ते तिचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तिच्या या निवडीबद्दल रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य बी.जी. आंधळे, प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे, प्र. पर्यवेक्षक सुभाष भुसाळ, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS