Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनी आयटीआयच्या 42 विद्यार्थ्यांची निवड

संगमनेर ः औद्योगिक क्षेत्रातील गरजेनुसार विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणार्‍या अमृतवाहिनी आयटीआय मधील 42 विद्यार्थ्यांची पुणे येथील शा

संजीवनीचे बुद्धीबळपटू जिल्ह्यात प्रथम
शेजमजूरांच्या डोळ्यात निघाल्या अळ्या
संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

संगमनेर ः औद्योगिक क्षेत्रातील गरजेनुसार विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणार्‍या अमृतवाहिनी आयटीआय मधील 42 विद्यार्थ्यांची पुणे येथील शारदा मोटर्स व टीव्हीएस लुकास या कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करता निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना भाटे म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्था ही गुणवत्तेमुळे देशात अग्रगण्य आहे. अमृतवाहिनी आयटीआय मधून फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटर मेकॅनिकल,  डिझेल मेकॅनिक या ट्रेड मधून कंपनीमध्ये आवश्यक असणारे उच्च दर्जाचे ट्रेनिंग दिले जात आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. संस्थेतील ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या वतीने कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन केले असून यामधून शारदा मोटर्स व टीव्हीएस कंपनी पुणे यांनी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेऊन 42 विद्यार्थ्यांची चांगल्या पदरावर नोकरी करता निवड केली आहे. या कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यू साठी टीव्हीएस कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर विद्या दिनगणे , मॅनेजर रीना हिवाळे व गजानन पाटील हे उपस्थित होते. तर शारदा मोटर्स कडून महादेव पाटील व देव आंबेकर हे उपस्थित होते. या इंटरव्यूच्या आयोजनाकरता संजय कुटे,संदीप दिघे व सचिन मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आ.डॉ. सुधीर तांबे, विश्‍वस्त शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य व्ही.व्ही.भाटे यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS