Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या 12 अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

कोपरगाव तालुका ः बेंचमार्क आयटी सोल्युशन्स या कंपनीच्या मानव व संसाधन (एचआर) विभागाने काही दिवसांपुर्वी संजीवनी इजिनिअरींग कॉलेजमध्ये कॅम्पस प्ले

स्वाईन फ्लू व कोरोना बाधित रुग्णांची तातडीने माहिती द्या
माधवलाल मालपाणी स्मृती मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
एसडीआरएफ जवानांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

कोपरगाव तालुका ः बेंचमार्क आयटी सोल्युशन्स या कंपनीच्या मानव व संसाधन (एचआर) विभागाने काही दिवसांपुर्वी संजीवनी इजिनिअरींग कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव अंतर्गत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींचा निकाल कंपनीने जाहिर करून नुकतेच विद्यार्थ्यांना प्रत्येकी रूपये सहा लाख वार्षिक पॅकेज नोकरीचे नेमणुकीचे पत्र दिले. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी.अँड.पी) विभागाच्या सततच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकर्‍या  मिळत आहेत, अशी माहिती संजीवनी महाविद्यालयाच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. बेंचमार्क आयटी सोल्युशन्स या कंपनीने यश  संजीव हलवाई, संकेत शंकर पानगव्हाणे, ऋषिकेश भरत पवार, वैष्णवी भीमाशंकर  पवार, निशा सुनिल आगलावे, संस्कृती खुशाल  केकाण, प्रांजल बाबासाहेब परजणे, तेजस धनंजय क्षिरसागर, मयुर महेश  मोरे, ओम मनोज सबणे, तेजस गोकुळ गुंजाळ व जयवंत बाळासाहेब वानखडे यांची निवड केली आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, डीन टी अँड  पी डॉ. विशाल  तिडके व डॉ.पी. एन. कालवडेकर यांचे अभिनंदन केले आहे.

माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकररावजी  कोल्हे यांनी आपल्या ग्रामिण भागातील सर्व घटकांमधिल मुला मुलींना चांगल्या कंपन्यांमध्ये मिळाव्यात  मिळाव्यात, काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून दुसर्‍यांच्या हातांना काम द्यावे आणि कुटुंबाचा आधार बनावे, या हेतुने सुमारे 40 वर्षांपूर्वी  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  अंतर्गत विविध संस्थांची स्थापना करून या संस्थांनी दर्जा व गुणवत्तेशी  कधीही तडजोड न करता आधुनिक शिक्षण  द्यावेे. त्यांच्या मार्गदर्शक  तत्वांनुसार सर्वच संस्था शिक्षण  देत आहे. सर्व संस्थांचे प्राचार्य, डायरेक्टर्स, डीन व विभाग प्रमुख अतिशय काळजीने अद्यापनाचे काम करित आहेत. याची परीनिती म्हणुन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षात  सुमारे 1224 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 211 पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये नोकर्‍या  मिळाल्या. तसेच 34 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कॅनडा, तैवान, रसिया, युके, ट्युनिसिया, इत्यादी देशांमधील  नामांकित विद्यापीठांमध्ये संशोधन  आंतरवासिता (रिसर्च इंटर्नशिप ) करण्याची संधी मिळाली. या सर्व उपलब्धींमुळे पालक वर्गात समाधानाचे वातावरण आहे. नितिनदादा कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स , कोपरगांव

COMMENTS