Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिव सुमंत भांगेेंनी जमवली 500 कोटींची बेहिशोबी मालमत्ता

सामाजिक न्याय विभागासह इतर ठिकाणी केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

मुंबई प्रतिनिधी - सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान सचिव सुमंत भांगे यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीमध्ये जिथे जाईल तिथे खाईल, यावृत्तीने कोट्याव

सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग पुणे
विधिमंडळांत बार्टीसह सचिव सुमंत भांगेची ‘पोलखोल’
पुणे प्रादेशिक सा.बां.विभागात निविदा घोटाळ्यांचा उच्चांक

मुंबई प्रतिनिधी – सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान सचिव सुमंत भांगे यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीमध्ये जिथे जाईल तिथे खाईल, यावृत्तीने कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवली असून, याप्रकरणाची उच्चस्तरीय समितीने चौकशी करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. सामाजिक न्याय विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व स्पर्धा परीक्षा केंद्र अर्थात बार्टीच्या माध्यमातून टक्केवारीच्या खेळामध्ये हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून, त्याप्रकरणी नुकतेच 42 आमदारांनी विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित केला होता.

यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, एका प्रशासकीय अधिकार्‍याची मालमत्ता किती असावी, तसेच एका शिक्षकाचा मुलगा असलेल्या अधिकार्‍याची संपत्ती किती असावी, असा प्रश्‍न पडल्यास त्यांना मिळणारे वेतन आणि त्यांनी कमावलेली माया, याच्यात कितीतरी पटीचा फरक पडतो. सचिव भांगे यांनी आपल्या प्रशासकीय कार्यकाळात कोट्यावधींची संपत्ती जमवली असून, त्यामध्ये अंदमान-निकोबारमध्ये हॉटेलमध्ये 200 कोटी रुपयांची भागीदारी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 कोटींचा प्रशस्त बंगला, बीड जिल्ह्यातील सारणी-सांगवी या गावामध्ये 100 एकरपेक्षा अधिक जमीन, याच शेतीमध्ये आलीशान फॉर्महाऊस, कोट्यावधी रुपयांची विहीर, अनेक अधिकार्‍यांच्या नेमणूका करण्यासाठी घेतलेले कोट्यावधी रुपयांची जमीन चित्ते पिपंळगाव, छत्रपती संभाजी साखर कारखाण्याजवळ 200 एकर शेती, नांदेड शहरालगत पावडेवाडी, तरोडा कौठा येथे प्लॉटींगच्या अनेक एकर जमिनी,  मुंबई, नवी मुंबई, पुणे, लोणावळा, छत्रपती संभाजीनगर, लखनऊ, परभणी, हिंगोली बीड येथे त्यांनी बेहिशोबी संपत्ती आणि शेकडो एकर जमीन आहे. उपजिल्हाधिकारी पदापासून कारकीर्द सुरू करणार्‍या सचिव भांगे यांनी आपल्या प्रशासकीय कार्यकाळात इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवल्यामुळे त्यांच्या संपत्तीच्या चौकशीसाठी उच्च-स्तरीय समिती नेमण्याची अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चारपेक्षा जास्त प्लॉट आणि बंगले आहेत. अशी पाचशेपेक्षा अधिक कोटींची बेहिशोबी अवैध मालमत्ता सचिव भांगे यांनी गोळा केली आहे. ती संपत्ती गोळा करण्यासाठी त्यांनी किती भ्रष्टाचार केला असेल, याची मोजदादच नाही.

छत्रपती संभाजीनगर मधील बंगला

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सारणी सांगवीमध्ये सचिव भांगे यांच्या मुलाच्या, पत्नीच्या नावांवर शेकडो एकर जमीन आहे. याठिकाणी असणारे प्रशस्त फॉर्म फाऊस, फळबागा, कामगारांना राहण्यासाठी घरे, अशी मोठी बडदास्त या फॉर्महाऊसवर आहे. त्याचे सातबारा उतारेच आमच्या हाती आले आहेत. यावरून सचिव भांगे यांची ज्ञात संपत्ती जर इतकी असेल, तर बेनामी संपत्ती किती असेल, याची मोजदादच करता येणार नाही. यासोबतच कोकणात असलेली जमीन, राजगुरूनगर-जुन्नर परिसरातील जमीन, अंदमान-निकोबारमध्ये पार्टनरशिपमध्ये असलेले हॉटेल, अशी अनेक ठिकाणी बेनामी आणि बेहिशोबी संपत्ती सचिव सुमंत भांगे यांनी गोळा केला असल्याचे समजते. त्यामुळे याप्रकरणी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केल्यास सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. राज्यात झालेले सत्तांतर आणि, आणि सामाजिक न्याय विभागाचा पदभार मुख्यमंत्री महोदयांकडे असल्यामुळे आणि त्यासोबतच त्यांच्याकडे इतर खात्याचा कारभार असल्यामुळे त्यांना या खात्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही, त्याचाच गैरफायदा घेत, सचिव भांगे यांनी आपले दोन पंटर मंत्रालयात केवळ वसुलीसाठी ठेवल्याचे समोर आले आहे. यादरम्यान, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सीईओ मनीष सांगळे यांची सध्या अण्णाभाऊ साठे महामंडळावर व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी लावण्यासाठी सचिव सुमंत भांगे यांनी तब्बल 1 कोटी रूपये घेतल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे. विशेष म्हणजे या पदावर आयएएस असणार्‍या व्यक्तीची नेमणूक करण्यात येते. मात्र नियम डावलून सांगळे यांची वर्णी लावण्यामागचे नेमके गौडबंगाल काय आहे, याची चौकशी होण्याची गरज आहे. याचबरोबर मनीष सांगळे यांची महामंडळावर वर्णी लावण्यासाठी एक कोटी रूपये घेतले अशी चर्चा सुरू आहे, याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या विभागात जोर धरतांना दिसून येत आहे.

जाईल तिथे खाईल या भूमिकेतून कमावली माया – सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या 30-32 वर्षाच्या सेवेमध्ये जाईल तिथे खाईल या भूमिकेतून वागले. सेलूचे उपजिल्हाधिकारी, नांदेडच्या नगरपरिषदेचे सीईओ, औरंगाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुंबई म्हाडामध्ये दोन वेळा साडेनऊ वर्षे, फिशरीज महामंडळ, रायगडचे जिल्हाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे सचिव या पदावर कार्यरत असतांना त्यांनी जवळपास 500 कोटींची माया जमविली आहे.

शिक्षकाचा मुलगा, वडिलोपार्जित 3 एकर शेती – असलेल्या अधिकार्‍याकडे इतकी संपत्ती आली कुठून
अनेक वर्ष राजकारणात असलेले मंत्री, खासदार, आमदार हे वर्षानूवर्षे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असूनही त्यांच्याकडे सुमंत भांगेच्या 10 टक्के एवढीही संपत्ती सापडणार नाही. एका शिक्षकाचा मुलगा असलेला व घरी वडीलोपार्जीत 3 एकर शेती असलेल्या सुमंत भांगे यांनी विविध ठिकाणी हॉटेल्स, बंगले, शेती आदीच्या रुपात प्रचंड माया जमविली आहे.

‘त्या’ दलालांचे धाबे दणाणले – सचिव सुमंत भांगे यांचे दलाल रोहन राऊत, सुर्वे, राजेश बांगर यांनी आमच्या बातम्यांचा धसका घेत त्यांच्या कार्यालयातील आपले बस्तान इतरत्र हलविले आहे. मात्र त्यांच्याच कार्यालयातील सहायक लेखा संचालक कल्याण औताडे आपल्या कार्यालयात न बसता, ते तासनतास सचिव सुमंत भांगे यांच्या चेंबरमध्ये कशासाठी बसतात? त्यांची नेमकी कोणती वसुली करतात? याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागातील समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचा रेट 50-60 लाखांच्या घरात असून, त्यात मध्यस्थी करून ही रक्कम वसुलीचे काम या दलालामार्फत होत असल्याची चर्चा चांगलीच रंगतांना दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यात दोन कोटींची विहीर – बीड येथील सारणी-सांगवी येथे सचिव सुमंत भांगे यांची 100 एकरपेक्षा अधिक जमीन असून, या जमिनीच्या सिंचनासाठी दोन कोटींची विहीर बांधली असून, या विहीरीत अवैधरित्या पाझर तलावातून पाणी उपसा करण्यात येतो. आपल्या पदाचा गैरवापर करून, आणि इतर अधिकार्‍यांना हाताशी धरून, जलसिंचन विभागाचे सर्व नियम पायदळी तुडवून थेट पाझर तलावातून अवैधरित्या पाण्याचा उपसा केल्यामुळे संपूर्ण गावाला पाणीपुरवठा अपुरा पडतो. गावकर्‍यांचे हक्कांचे पाणी सचिव सुमंत भांगे अवैधरित्या आपल्या विहिरीत घेवून, आपली शेती, फॉर्महाऊसची गरज भागवत असल्याचे दिसून येत आहे.

 बीड जिल्ह्यातील सारणी-सांगवीमध्ये 100 एकर जमीन, प्रशस्त फॉर्महाऊस

सचिव भांगे यांच्या ज्ञात-अज्ञात संपत्ती –
1. अंदमान निकोबारमध्ये 200 कोटींचे हॉटेलमध्ये भागीदारी
2. चित्ते पिपंळगाव, छत्रपती संभाजी साखर कारखान्याजवळ 200 एकर शेती
3. नांदेड शहरालगत पावडेवाडी, तरोडा कौठा येथे प्लॉटींगच्या अनेक एकर जमिनी
4. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चारपेक्षा जास्त प्लॉट आणि बंगले आहेत.
5. बीड जिल्ह्यातील सारणी-सांगवीमध्ये 100 एकर जमीन, प्रशस्त फॉर्महाऊस
6. राजगुरूनगर-जुन्नरमध्ये 50 एकर जमीन 100 म्हशीचा गोठा
7. कोकणात असलेली कितीतरी एकर जमीन

या प्रश्‍नांचे उत्तरे कोण देणार ? –
1- खारघरमध्ये जावयाला तीन फ्लॅट कुणी दिले?
2- डी. वाय.पाटीलमध्ये जावयाला एम.डी.करण्यासाठी पाच कोटी कुणी दिले?

COMMENTS