Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

द्रमुक-काँग्रेसमध्ये जागावाटप निश्‍चिततामिळनाडू विधानसभा निवडणूक 

चेन्नई : तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर द्रविड मुन्नेत्र कळघम आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. झ

राज्यातील 29 महापालिका क्षेत्रात मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी
शिक्षक, पदवीधरची निवडणूक जाहीर
राज्यात लोकशाही संपली, झुंडशाही सुरू ः उद्धव ठाकरे
After Weeks Of Sparring, Congress Settles For 28 Seats In Tamil Nadu

चेन्नई : तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर द्रविड मुन्नेत्र कळघम आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. झालेल्या समझोत्याअंतर्गत काँग्रेस पक्ष 28 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असून द्रमुकने काँग्रेसला राज्यसभेची एक जागाही देण्यास मान्यता दिली आहे.
द्रमुकचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन तसेच तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के. सेल्वपेरुंथगई यांच्यात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन्ही पक्षांनी युती कायम ठेवत आगामी निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी एप्रिल महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. 2021 मधील निवडणुकीत द्रमुकने 133 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली होती, तर काँग्रेसला 18 जागा मिळाल्या होत्या. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला एकूण 159 जागांवर यश मिळाले होते. त्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 75 जागा मिळाल्या होत्या आणि त्यात अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. जागावाटपाच्या चर्चेदरम्यान काही काळ दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. काँग्रेसने अधिक जागांची मागणी केल्याने वाटाघाटी काही काळ ठप्प झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी स्टालिन यांची भेट घेतली. झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीचा मार्ग निघाला. सूत्रांच्या माहितीनुसार, द्रमुक सुरुवातीला काँग्रेसला सुमारे 25 जागा देण्याच्या भूमिकेत होती. मात्र चर्चेनंतर ही संख्या वाढवून 28 जागांवर सहमती झाली. त्यामुळे 2004 पासून सुरू असलेली दोन्ही पक्षांची युती आगामी निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

COMMENTS