Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात होणार हंगामी पद भरती

नाशिक- जिल्हा सैनिक कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र व सैनिकी मुलांचे वसतिगृहात सहाय्यक अधीक्षिका, स्वयंपाक

बायकोच्या चारित्र्याच्या संशयावरून बापाने चिमुकल्याला आपटलं फरशीवर
लंकेंनी शपथ घेतली आणि नितीनने घातली पायात चप्पल
अकोले बस स्थानकात प्रवासी दिन उत्साहात

नाशिक– जिल्हा सैनिक कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र व सैनिकी मुलांचे वसतिगृहात सहाय्यक अधीक्षिका, स्वयंपाकी व मसालची प्रत्येकी  एक पदाची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक उमेदवारांनी  29 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.

सहाय्यक अधीक्षिका या पदासाठी पदवी अथवा पदव्युत्तर अशी शैक्षणिक पात्रता असून महाविद्यालयाशी समन्वय साधण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. स्वयंपाकी पदासाठी स्वयंपाक बनविण्याचा अनुभव तर मसालची या पदासाठीही मसालची कामाचा अनुभव आवश्यक आहे.

वरील प्रमाणे पात्र नागरी उमदेवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे सादर कारावेत. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या  0253-2577255 या दूरध्वनीवर  संपर्क साधावा, असेही ओंकार कापले यांनी कळविले आहे.

COMMENTS