Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विज्ञानामुळे अंधश्रद्धा दूर होते-अ‍ॅड. उध्दवराव कराड

केज । प्रतिनिधीकेज तालुक्यात दोन दिवस चाललेल्या बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे समापन आज झाले. समारोप प्रसंगी बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ

भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
क्रांतीनगरमध्ये उत्साहपूर्ण हळदी-कुंकू सोहळा
केजमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह; तिळगूळ घ्या, गोड गोड बोलाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

केज । प्रतिनिधी
केज तालुक्यात दोन दिवस चाललेल्या बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे समापन आज झाले. समारोप प्रसंगी बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ, केज चे अध्यक्ष अ‍ॅड. उध्दवराव कराड यांनी बाल वैज्ञानिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रयत्न हाच परमेश्वर असून सतत प्रयत्न करून संशोधन केल्यास यशस्वी होऊ शकतो. शोधाचा उपयोग कसा करायचा हे समजून, माणसाला सुखकारक उपकरण तयार करणे आवश्यक आहे. विज्ञानामुळे अंधश्रद्धा दूर होते आणि हे प्रदर्शन हिरे शोधण्याचा प्रयत्न आहे, ज्यातून मोठे शास्त्रज्ञ जन्माला येतात.
कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, साने गुरुजी संकुलाच्या प्राचार्या डॉ. कविता कराड, शिक्षक गणेश लक्ष्मणराव, भानगे सर, जोगदंड सर, लोकरे सर, राहुल शिंदे सर, मदने सर, सुनील कांबळे सर, ज्ञानोबा माने, श्रीमती बाराते, रुपनर मॅडम, श्रीमती कदम, वाघमारे, नयुम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती श्रुती लहाने यांनी केले तर आभार प्रदर्शन गुजर एल.जी. यांनी केले.

COMMENTS