अकोले : तालुक्यातील मुतखेल माध्यमिक आश्रम शाळा येथे विज्ञान दिनाचे आश्रम शाळा व चिचोंडी महाविद्यालयाने संयुक्तपणे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदिनाथ सुतार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चिचोंडी (भंडारदरा)येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे हे होते. डॉ. डोंगरे आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले की, मुलांना आईन्स्टाईनसारखे प्रश्न पडले पाहिजेत. नामांकित शास्त्रज्ञाच्या संशोधनाचा अभ्यास करून सतत नाविन्याचा शोध घ्या आपल्यातील सृजनशीलता सदैव जागृत ठेवा.असे आवहान डाॅ.डोंगरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमात शास्त्रज्ञाच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमात प्रा. प्रदिप पथवे,प्रा. जनार्धन वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन नाटिकेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमधे रुजवण्यासाठी ही एक उत्तम संकल्पना असल्याचे पथवे यांनी सांगितले. विविध वैज्ञानिक संकल्पना व नाट्यछटेत आश्रमशाळेतील मुलांसह,चिचोंडी महाविद्यालयाचे विद्यार्थी अवसरकर प्रियंका,खतेले वनिता,सगभोर ऋतिक ,लोटे प्रशांत, गभाले रोशन सगभोर प्रज्ञा,अथर्व धाडवड, बांडे ओंकार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब लोंढे, क्षितिजा सोनवणे, तळपे आकांक्षा यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी ज्ञानेश्वर घाणे व विठ्ठल आडे यांनी आभार मानले.

COMMENTS