शाळा नेहमी खुल्या राहायला हव्यात : डॉ. स्वामीनाथन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळा नेहमी खुल्या राहायला हव्यात : डॉ. स्वामीनाथन

शाळेअभावी दोन वर्षांत मुलांचा सामाजिक विकास थांबलानवी दिल्ली : देशातील विविध राज्यात गेल्या दोन वर्षांपासून शाळा मोठया प्रमाणावर बंदच राहिल्या आहेत.

ईडीच्या जरंडेश्वर कारवाईनंतर पुढील नंबर कुणाचा ?
ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन
हेलिकॉप्टर अपघात टाळण्यासाठी काटकसरीचा नको : आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला

शाळेअभावी दोन वर्षांत मुलांचा सामाजिक विकास थांबला
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यात गेल्या दोन वर्षांपासून शाळा मोठया प्रमाणावर बंदच राहिल्या आहेत. काही महिन्यांचा अपवाद सोडल्यास मुलं दोन वर्षांपासून शाळेत आलेली नाहीत. यावर बोलतांना जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे शाळा बंद ठेवणे योग्य नाही. शाळा सुरू नसल्यामुळे मागील दोन वर्षात मुलांचा सामाजिक विकास थांबवला आहे. मात्र मुलांना कोरोनाचा तितका धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत शाळा नेहमी खुल्या राहायला हव्यात असे मत मांडले.
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, यासाठी लोकांना आणि सरकारांना विचार करण्याची गरज आहे. कारण, ओमायक्रॉन कोरोनाचा अखेरचा व्हेरियंट नाही. अशी शक्यता आहे की, भविष्यात याचे आणखी व्हेरियंट्स समोर येतील. अशी स्थितीत आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे. जर भविष्यात पुन्हा अशी प्रकरणे वाढू लागली तर आपल्याला काय क्शन घ्यावी लागेल. आधी काय बंद करावं लागेल. सुरुवातीपासूनचे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने म्हटले आहे की, शाळा नेहमी खुल्या राहायला हव्यात. कारण, आम्हाला माहिती आहे की, मुलांचे केवळ शिक्षणच नाही तर संपूर्ण विकासदेखील शाळेत होतो. मागील दोन वर्षात मुलांचे खूप नुकसान झाले आहे. हे नुकसान दीर्घकाळ सहन करायला लावणारे नुकसान आहे. आमचा सल्ला आहे की, जगभरात सर्व सरकारने जिथे शक्य असेल तिथे शाळा उघडाव्यात. त्या म्हणाल्या, पालकांना प्रश्‍न आहे की, लसीकरणाविना मुलांना शाळांना पाठवणे योग्य असेल का? तर उत्तर आहे की, हो आपण पाठवू शकतो. कारण, दोन वर्षांपासून आपण जे कोरोनाचे संक्रमण पाहत आलोय, यामध्ये एक बाब समोर आलीय की, जर मुलांना संक्रमण झालेचं तर ती अधिक आजारी पडत नाहीत. खूप कमी अशी मुले आहेत की, ज्यांना आधी गंभीर आजार असेल, त्यांनी धोका आहे. तर निरोगी मुलांना याचा कमी धोका आहे. मुलांना शाळेला पाठवल्यामुळे काही केसेस नक्की वाढू शकतात. यापासून बचावासाठी सहा वर्षांपेक्षा मोठी मुले मास्क लावून शाळेला जाऊ शकतात.

बंद करण्याच्या यादीत शाळा शेवटी हव्यात
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी म्हटले आहे की, बंद करण्याच्या यादीत शाळा सर्वात शेवटी यायला हव्या. आणि उघडण्यात सर्वात आधी यायला हव्यात. दोन वर्षात कोरोना संक्रमणात हे निदर्शनास आले की, मुलांवर कोरोनाचा सर्वात कमी परिणाम झालाय. जर मुलांनादेखील अधिक प्रमाणात कोरोनाची लागण झाली असती तर ती कमी आजारी पडली असती. म्हणून आवश्यक त्या गोष्टींचं पालन करून शाळा उघडल्या जाऊ शकतात, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील शाळा सोमवारपासून राहणार सुरू
कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली होती. त्यानंतर ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर काही अटींवर पुन्हा शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शाळा व महाविद्यालये पुर्णवेळ सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवर सोमवारपासून पुणे येथील सर्व शाळा पुर्णवेळ सुरू राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

COMMENTS