Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत प्रदूषणामुळे शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील हवा प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाल्यानंतर दिल्ली सरकारने दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त

शिर्डीतील 4 मालकांवर पिटा अंतर्गत कारवाई
पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पाच कोटी भेज दे नहीं तो उठा लुंगाँ | LOKNews24

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील हवा प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाल्यानंतर दिल्ली सरकारने दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीदेखील राजधानीतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यामुळे दिल्ली सरकारने प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इयत्ता 6 वी आणि 12 पर्यंतच्या शाळा या ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवल्या जाणार आहे.
आगामी काही दिवसांवर दिवाळी येवून ठेपल्यामुळे दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढण्याची शक्यता करण्यात येत आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री आतिश यांनी रविवारी ट्विट करत या बाबत माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शहरातील प्रदूषण पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे दिल्लीतील प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. तर इयत्ता 6 ते 12 च्या वर्ग हे ऑनलाइन घेतले जातील. प्रदूषित वातावरण आणि दूषित वारे यांच्यामुळे रविवारी सलग सहाव्या दिवशी दिल्लीत वातावरण सर्वाधिक प्रदूषित होते. दिल्लीचा हवा प्रदूषणाचा निर्देशांक हा ’अत्यंत गंभीर’ श्रेणीत पोहोचला आहे. दिल्लीत, शनिवारी दुपारी 4 वाजता हवा प्रदूषणाचा निर्देशांक हा 415 नोंदवला गेला. तर रविवारी सकाळी 7 वाजता 460 पर्यंत घसरले.दिल्लीत हवा प्रदूषण निर्देशांक हा 450 ओलांडल्यास, केंद्राची वायू प्रदूषण नियंत्रण योजना लागू करणे बंधनकारक आहे. यामुळे प्रदूषण करणार्‍या ट्रक, चारचाकी व्यावसायिक आणि वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी देखील घातली जाऊ शकते.

COMMENTS