Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षा ही एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी :- अभय आव्हाड 

पाथर्डी प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प

जय हिंद फाउंडेशनने पाथर्डी तालुक्यात लावली सर्वाधिक वडाची झाडे
आयटीआय प्रवेशाची अंतिम तारीख 24 ऑगस्ट
जागर वाचनाचा उपक्रमामुळे वाचन चळवळ बळकट

पाथर्डी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. आठवी निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धा परीक्षेत पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या शाळेचे ११ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले.

      जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अभय आव्हाड म्हणाले, की शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे या परीक्षेमुळे एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी होते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबद्दल आवड निर्माण होते.परीक्षेत मिळालेले यश हे विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य,परिश्रम, सराव व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन तसेच पालकांचे सहकार्य यामुळे प्राप्त झाले आहे. यासारख्या परीक्षेत विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास व सराव केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चपदपदाचे अधिकारी निर्माण होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.

जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: इयत्ता पाचवी: कार्तिकी नंदू अनाप, संस्कृती महावीर कर्नावट, प्रणित संतोष पालवे, मन अजय केला, पुष्कर प्रमोद दहिफळे, प्राची शशिकांत रणदिवे, सिद्धार्थ विष्णू शेळके, सोहम भाऊसाहेब साखरे व इयत्ता आठवी: प्रज्ञा हरिभाऊ डमाळे, प्रज्ञा विकास पालवे, तन्मय शंकर भडके या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्ष महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहेत.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद मेढे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके यांनी  तर आभार विठ्ठल धस यांनी मानले.  यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर गायके, विठ्ठल धस, अर्चना दराडे, दुर्गा भगत, अक्षय भंडारी, रजनी भोईटे, शरद बुधवंत आदींचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS