Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतांसाठीच भारतरत्न देण्याचा डाव

उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः जिवंतपणी त्या व्यक्तीला विरोध करायाचा, जिंवतपणी त्या व्यक्तीच्या योगदानाबद्दल दुर्लक्ष करायचे आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्या समुदायातील मत

उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर
उद्धव ठाकरे मोदींशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात
हुकूमशाही दारापर्यंत पोहोचली

मुंबई ः जिवंतपणी त्या व्यक्तीला विरोध करायाचा, जिंवतपणी त्या व्यक्तीच्या योगदानाबद्दल दुर्लक्ष करायचे आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्या समुदायातील मतांसाठीच भारतरत्न पुरस्कार देण्याचा येत असल्याचा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला आहे. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशनातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मोदींना हवे त्यांना भारतरत्न देत आहेत, ज्यांचा जिवंत असताना विरोध तुम्ही केला, जसे की कर्पुरी ठाकूर, त्यांना जनसंघाने विरोध केला होता, तेव्हा तुम्ही देखील त्यांना विरोध केला, आता बिहारध्ये मत हवे म्हणून त्यांना भारतरत्न देत आहात, तसेच आम्ही तेव्हा मागणी केली होती एम.एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, जर भारतरत्न देत आहात तर त्यांनी दिलेला अहवाल देखील लागू करावा, हा पोकळपणा आहे, येत्या काळात आणखीन काही भारतरत्न जाहीर करतील, भाजपला वाटत आहे की, एक अख्खा प्रदेश आपल्या बाजूने येईल, पण आता असे राहिले नाही. आपल्याकडे भाजपासारखा पैसा नाही पण सोन्यासारखी मौल्यवान, निष्ठावंत माणसे माझ्यासोबत आहेत, ही माझी संपत्ती आहे. हे माझे भांडवल आहे. जो राज्यकर्ता नोकरी देऊ शकत नसेल, महागाई, गुंडागिरी थांबवू शकत नसेल, तर तो राज्यकर्ता म्हणून खुर्चीत बसण्यास नालायक आहे, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

पक्ष संपवण्याचा भानगडीत पडू नका – गेल्या 56-57 वर्षांत शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतली आहेत. आत्ताही शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची घाई काहींना झालेली आहे. त्यांच्या लक्षात आलेले नाही की शिवसेनेची मुळे इतक्या खोलवर गेली आहेत, की ती उपटायला गेलात तर तुम्ही तुमच्या मुळांसकट उपटले जाल. त्यामुळे त्या भानगडीत पडू नका, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

COMMENTS