वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे झारखंडमधून जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे झारखंडमधून जेरबंद

बीकेसी सायबर पोलिसांची कारवाई - तक्रारदाराच्या खात्यातून केले होते 55 हजार रुपये लंपास

मुंबई प्रतिनिधी - राज्यात गेल्या काही दिवसांपासून वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍यांचा सुळसुळाट सुटला असून, या भामटयांनी अनेकांना गंडा घात

आमदार थोरात यांच्या प्रचारार्थ प्रत्येक गावात प्रचार फेरी संपन्न
Dhule : गावाजवळील नाल्यात ट्रक चालकाने टाकले घातक विषारी रसायन (Video)
पुस्तकं खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणामुळे नववीतील चौदा वर्षीय मुलीने घेतला गळफास

मुंबई प्रतिनिधी – राज्यात गेल्या काही दिवसांपासून वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍यांचा सुळसुळाट सुटला असून, या भामटयांनी अनेकांना गंडा घातल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोन भामट्यांना मुंबई पोलिसांनी झारखंड(Jharkhand) राज्यातून अटक केली आहे. सचिनकुमार भरत मंडल (वय 24 वर्षे) आणि संजितकुमार सिताराम मंडल (वय 25 वर्षे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
झारखंड, पश्‍चिम बंगाल अशा राज्यात बसून, ते इतर राज्यात बल्क मेसेज पाठवत असत. तुम्ही मागील महिन्यात वीज बिल भरले आहे. परंतु ते सिस्टमला अपडेट झाले नसल्याने तुमची लाईट कट करण्यात येईल, असे सांगून या दोघांनी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सुधीर भानुदास माने असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुधीर भानुदास माने यांच्या मोबाईल क्रमांकावर वीज बिलासंदर्भात मेसेज आला. तुमचे वीज बिल अपडेट नसल्यामुळे वीज कट करण्यात येईल, असा मेसेज सुधीर माने यांना 17 नोव्हेंबर रोजी आला होता. सोबतच यात मोबाईल क्रमांकही दिला होता. घाबरलेल्या माने यांनी तात्काळ मेसेजमधील मोबाईल क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने तुमचे बिल ऑनलाईन अपडेट करत असल्याचे सांगून त्यांना दहा रुपयांची पेमेंट लिंक पाठवून त्यावर पेमेंट करण्यास सांगितले. सुधीर माने यांनी पेमेंट करताचा आरोपींनी त्यांचे बँक डिटेल्स मिळवले आणि खात्यातून 55 हजार रुपये काढले. बँकेतून तब्बल 55 हजार रुपये डेबिट झाल्याचे कळताच माने यांनी त्या व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुधीर माने यांनी तातडीने वांद्रेमधील बीकेसी पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींकडून व्हॉटसप्रोमो या अ‍ॅपचा वापर – सुधीर माने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बिकेसी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 419, 420, 34 सह कलम 66(क), 66 (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तांत्रिक कौशल्याचे आधारे गुन्ह्याचा तपास करुन दोन्ही आरोपींना 20 नोव्हेंबर रोजी झारखंड या ठिकाणाहून अटक करण्यात आली. तसेच बीकेसी सायबर पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेले एकूण सहा मोबाईल फोन आणि विविध कंपन्यांचे दहा सिमकार्ड जप्त केले आहेत. गुन्हा करण्यासाठी आरोपींनी व्हॉटसप्रोमो या अ‍ॅपचा वापर करुन बल्क मेसेज पाठवून भारतातील विविध भागातील नागरीकांना फसवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरु आहे.

वीज कनेक्शन बंद करण्यात येईल असा मेसेज आल्यास सावध व्हा – एखाद्या अनोळखी नंबरवरून तुम्ही भरलेले वीज बिल सिस्टमध्ये अपडेट झालेले नाही, किंवा तुम्ही वीज बील भरलेले नाही, असा मेसेज जर तुम्हाला आलास तर वेळीच सावध व्हा. कारण अशा मेसेजच्या माध्यमातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण आलेल्या मेसेजवर कॉल करता आणि तुमची फसवणूक होते. अगोदर तुम्हाला 10 रुपये किंवा 100 रुपयांची लिंक पाठवून पेमेंट करायला लावले जाते. आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरुन मोठी रक्कम काढली जाते. त्यामुळे असा मेसेज आल्यास वेळीच सावध होण्याची गरज आहे.

अहमदनगर शहरातूनही अनेकांना गंडा – अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात देखील अनेकांना तुम्ही वीज बिल भरले नसल्याचे मेसेज आले आहेत. काहींनी सावध भूमिका घेतली, तर अनेक जण या भामटयांच्या भूलथापांना बळी पडत, आपले खाते रिकामे करून बसले आहेत. अशा तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. 

COMMENTS