Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलजीवन मिशन योजनतेतील कामांमध्ये घोटाळा

चौकशीची माजी खासदार वाकचौरे यांची मागणी

कोपरगाव तालुका ः सरकारच्या जल जीवन मिशन योजनेमधून अनेक गावांना पाण्यासाठी कोट्यावधीचा निधी आला.  परंतु या योजनांमध्ये प्रचंड भानगडी, गडबडी झाल्या

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामाची चौकशी करा
हिमायतनगर तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार
जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत

कोपरगाव तालुका ः सरकारच्या जल जीवन मिशन योजनेमधून अनेक गावांना पाण्यासाठी कोट्यावधीचा निधी आला.  परंतु या योजनांमध्ये प्रचंड भानगडी, गडबडी झाल्या. त्याची शहानिशा झाली पाहिजे, नाहीतर या योजना कागदावरच राहतील. लोक अजूनही तहानलेलेच आहेत. दोन दोन वर्षे झाले परंतु पाण्याचा एकही थेंब नाही ज्या ठेकेदारांची क्षमता नाही अशा ठेकेदारांना 20-20 कामे दिली गेली. परिणामी ती कामे अपूर्णच राहिली. हजारो कोटी आले पण योजना वाया गेल्या आहेत. असा आरोप माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी करत मी ज्या प्रश्‍नांचा पाठपुरावा केला ते प्रश्‍न आजही तसेच आहे. आजही कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी मिळू शकत नाही हे नेतृत्वाचे आणि जनतेचे दुर्भाग्य असल्याची टीका माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विविध विषयावर कोपरगाव येथील हॉटेल स्पॅन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते वाकचौरे पुढे म्हणाले की, जलजीवन मिशन योजना ज्या-ज्या गावात चालु आहे, त्या गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष ठेवून माहिती घेतली पाहिजे, असे आव्हान करत समन्वयी पाणी वाटप कायदा आपल्यासाठी घातक आहे. पुढच्या पिढीसाठी या कायद्याचे पुनर्वलोकन झाले पाहिजे. पाण्यामुळे येथील बाजारपेठ उध्वस्त झाली. शेती व विकास ठप्प झाला, हाताला काम नाही,  दारणा धरण आमच्यासाठी बांधले व त्याचा लाभ जायकवाडीला हे अन्यायकारक आहे गोदावरी लाभ क्षेत्र उध्वस्त झाले. आज निळवंडेचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे. परंतु निळवंडेसाठी लागणार्‍या 17 पैकी 14 मान्यता मी स्वतः घेतल्या. त्यातील तीन मान्यता तर थेट उच्च न्यायालयातून घेतल्या असल्याचा दावा खासदार वाकचौरे यांनी केला. गेल्या काही दिवसापासून चुकीच्या पद्धतीने  निळवंडेचे श्रेय घेतले जात आहे. हे अयोग्य आहे, अनंत प्रयत्नाचा परिपाक म्हणून आजचे निळवंडे कालवे  दिसत आहेत. भविष्यात या कालव्यांचे विचारपूर्वक नियोजन करावे लागेल. आज श्रेय व पाणी सोडण्याच्या नादात वेगळेच काम सुरू आहे अशी जोरदार टीका त्यांनी प्रस्थापित श्रेयवाद्यांवर केली. गोदावरी कालव्यांच्या नूतरणीकरणासाठी 452 कोटी निधीची मागणी केली होती. या कामाला काही पैसे सुद्धा आले होते.  हे काम झाले की नाही कसे झाले याची शहानिशा व्हायला पाहिजे असेही वाकचौरे म्हणत. रस्त्याची ही तीच दुरावस्था आहे. लोकांचे जीव जात आहे वाहने खिळखिळी झाली असल्याचे सांगितले. यावेळी उत्तर नगर जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख सनी वाघ, माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड, माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, कुकुशेठ सहानी, वर्षा शिंगाडे, प्रफुल शिंगाडे, इरफान शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS