मुंबई प्रतिनिधी - 2020 मध्ये प्रदर्शित झालेली स्कॅम 1992 ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी' ही वेबसीरिज प्रेक्षकां

मुंबई प्रतिनिधी – 2020 मध्ये प्रदर्शित झालेली स्कॅम 1992 ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता ‘स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता पुन्हा एकदा ओटीटीवर ‘स्कॅम १९९२’नंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही घटना पत्रकार संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आली आहे. शेअर करण्यात आलेल्या ट्रेलमध्ये २००३ मधील मुंबईतील एक घटना दाखवली आहे. स्कॅम २००३ च्या ट्रेलरमध्ये, सर्वात आधी अब्दुल करीम तेलगीच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय मंडळींपर्यंत त्याच्या नावाची चर्चा होताना दिसतेय. अब्दुल तेलगी पुढे स्टॅम्प घोटाळा कशाप्रकारे करतो, याची कथा दाखवण्यात आली आहे. सोबतच राजकीय मंडळींपर्यंत त्याच्या नावाची ही कशाप्रकारे चर्चा होते, हे सुद्धा दाखवण्यात आला आहे. अब्दुल करीम तेलगीने २००३ मध्ये केलेला ३०,००० कोटींचा घोटाळा कशा प्रकारे समोर येतो, हे आपल्याला येत्या १ सप्टेंबरलाच कळणार आहे. अब्दुल करीम तेलगीबद्दल सांगायचे तर, तो स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मास्टरमाईंड होता. करीमचा हा घोटाळा जवळपास १६ राज्यांमध्ये पसरलेला होता. अब्दुलने २००३ मध्ये सुमारे ३० हजार कोटींचा बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा केला होता. २००१ मध्ये त्याला अजमेरमधून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला ३० वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा मिळाली होती आणि त्यासोबतच २०२ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले होते. २३ ऑक्टोबर २०१७ रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचं एका अल्पशा आजारामुळे निधन झाले होते.
COMMENTS