धान्यवाटप सुरू असल्याचे सांगत वृद्ध महिलेच्या अंगावरील 7 तोळे सोने लंपास !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धान्यवाटप सुरू असल्याचे सांगत वृद्ध महिलेच्या अंगावरील 7 तोळे सोने लंपास !

अंबरनाथ मधील घटना वृद्ध महिलेच्या अंगावरील 7 तोळे सोन्यासह 32 हजार रोकड लंपास

अंबरनाथ प्रतिनिधी- अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. धान्यवाटप सुरु असल्याचा बहाणा करत एका महिलेच्या अंगावरील सात तोळे सोन्यासह

कार्यकर्ते आ. जयंत पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे
‘नवरदेव (Bsc Agri.)’ शेतकरी राजाची गोष्ट, टिजर रिलीज
धनगर आरक्षण लढा तीव्र करा मी ताकदीने पाठीशी.:- मनोज जरांगे  

अंबरनाथ प्रतिनिधी– अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. धान्यवाटप सुरु असल्याचा बहाणा करत एका महिलेच्या अंगावरील सात तोळे सोन्यासह एकूण 32 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनिता ठाणगे या महिलेसोबत हा प्रकार घडला असून सुनिता याचं वय 62 वर्ष आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यात एक जण या महिलेला धान्यवाटप सुरु असल्याची बतावणी करत असल्याचं दिसून आलंय. या चोरट्याने टोपी घातली असून त्याचा चेहराही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय. पोलीस पुढील तपास करीत आहे.

COMMENTS