Homeताज्या बातम्यासंपादकीय

सावित्रीमाईं’चा महाराष्ट्र !

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज १९३ वी जयंती. त्यांच्या जयंती महोत्सवाचा द्विशतकीय महोत्सव अवघ्या पाच सहा वर्षांवर येऊन ठेपला आहे. या दोन

शेअर मार्केट का गडगडतेय ! 
पलटीबाज नितिशकुमार ! 
धर्माचा विवेक शाबूत ठेवा !

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज १९३ वी जयंती. त्यांच्या जयंती महोत्सवाचा द्विशतकीय महोत्सव अवघ्या पाच सहा वर्षांवर येऊन ठेपला आहे. या दोनशे वर्षाच्या काळात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर, संपूर्ण भारताला सावित्रीबाई यांचे स्मरण आज करावे लागते आहे. या देशातील प्रत्येक स्त्री – जी शिक्षणासारखे वाघिणीचं दूध पिऊन आज गुरगुरते आहे – त्या स्त्री समाजाचा ५० टक्के हिस्सा आज समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण ढवळून काढतो आहे. याचा दबाव तमाम शासन संस्थेवर उमटला आहे. त्यामुळेच राजस्थान, मध्यप्रदेशच्या निवडणुकांमध्ये स्त्रियांसाठीच्या योजना फार महत्त्वपूर्ण ठरल्या. कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये महिला कुटुंब प्रमुख असलेल्या स्त्रियांना रोख रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ते सत्तेत आल्यावर पूर्णही करण्यात आलं. महाराष्ट्रातील महिलांना राज्य सरकारने बस भाड्यात ५० टक्के सूट दिली आहे. अर्थात, यापूर्वी स्त्रियांसाठीचे कायदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून समाजासमोर आणले. आणि त्याचा बेस धरून अनेक कायदे स्त्रियांसाठी बनले. सावित्रीमाई यांचे क्रांतिकारी कार्य समाज सुधारणा म्हणून आपल्याला पाहता येणार नाही. आजच्या काळात आपण पाहतो की एखादी गोष्ट बोलल्यानंतर त्या विरोधात कारवाई होते, त्यादृष्टीमुळे समाजाचे अनेक घटक साधे बोलायलाही धजत नाही. तर, सावित्रीमाई या त्या काळात प्रत्यक्ष कृती करत होत्या; की, ज्यावेळी राजकीय स्वातंत्र्य तर सोडाच पण सामाजिक पातळीवर अक्षरश: गुलामगिरी होती. अशा काळातही सावित्रीमाई यांनी आपल्या अंगावर दगड- गारा झेलत, या देशाच्या स्त्रियांना भावी काळातल्या समाजाचा आधारस्तंभ बनविण्यासाठी,  स्वतःची झीज केली. त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. सावित्रीमाई यांनी केवळ पहिली महिला शिक्षिका म्हणूनच काम केलं नाही, तर, त्यांनी या देशातल्या सामाजिक स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत झोकून दिलं. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढल्यानंतर, त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आज त्या घटनेलाही जवळपास ८६ वर्ष झाली. या सबंध काळामध्ये आज महिलावर्ग शिक्षित होऊन, राजकीय सत्तेपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या सर्व क्षेत्रात आगेकूच करत आहेत. परंतु, त्यांना आपल्या जीवनामध्ये जर कृतज्ञ राहायचं तर, त्यांनी सर्वप्रथम सावित्रीमाई फुले यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सर्वाधिक कार्य जर काही केलं असेल तर, या देशात सर्वांसाठी शिक्षण आणि सर्व समाजासाठी  समता प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांनी केलं. या कार्यामध्ये त्यांना अनेक अडचणींनाच नव्हे, तर अनेक संकटांचा सामना करावा लागला. आज जे सर्वाधिक सुसंस्कृत म्हणून स्वतः वावरत आहेत, अशा समूहाकडून त्या काळात त्यांना काय यातना सहन करायला लागल्या आहेत, हे इतिहासाच्या पानावर आपल्याला नक्कीच वाचायला मिळते .परंतु त्यासाठी सावित्रीबाई अडकल्या नाहीत. महात्मा ज्योतिबा  फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी जर आपल्या जीवनामध्ये सर्वाधिक संस्था जर कोणत्या निर्माण केल्या असतील तर त्या शैक्षणिक संस्था अस्पृश्यांसाठी शाळा मुलींसाठी शाळा अनाथांसाठी शाळा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेल्या या शिक्षण संस्थांचा आदर्श छत्रपती शाहू महाराजांनी घेतला आणि त्यांनी आपल्या संस्थानाअंतर्गत जेवढा परिसर येईल, त्या परिसरामध्ये शिक्षण देण्यासाठी वस्तीगृहे निर्माण केली. शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त केले. आपला वैचारिक वारसा छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमातूनच घेतला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा वैचारिक वारसा छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचतो.  या दोन्ही कार्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या एकूणच विचारांमध्ये ची कृतीची जोड दिली. म्हणून आजचा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरी महाराष्ट्र म्हणत असताना, हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर आणि सावित्रीमाई जिजाऊ आणि रमाई यांचाही आहे!
कोट कोटी प्रणाम!

COMMENTS