Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोकुळचंदजी विद्यालयात सावित्रीबाईंची जयंती उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली. या निमित्तानं मुख्याध्यापक मक

हळदी समारंभासाठी रस्ता अडवला, नवरदेवावर गुन्हा
जात वैधता प्रमाणपत्राच्या मार्गदर्शनासाठी आज ऑनलाईन वेबनार
देशमुख महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली. या निमित्तानं मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,डा.अमोल अजमेरे, संदीप अजमेरे आदींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षिका उमा रायते यांनी विदयार्थींना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षक अनिल अमृतकर, अनिल काले, विजय कार्ले, रघुनाथ लकारे यांनी आदी शिक्षक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. सुत्रसंचलन सुरेश गोरे यांनी तर आभार सुरेंद्र शिरसाळे यांनी मानले.

COMMENTS