श्रीगोंदा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी श्रीगोंदा माध्यमिक (ज्ञानदीप) विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करुन विद्यालयामध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाल आनंद मेळाव्यानिमित्त विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मनीषा आनंदकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तसेच नगरसेविका सोनाली गोरे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदकर बी.बी., सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सेवकवृंद आणि पालक यांनी सर्वांचे कौतुक केले. याप्रसंगी नगरसेविका गोरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.

श्रीगोंदा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी श्रीगोंदा माध्यमिक (ज्ञानदीप) विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करुन विद्यालयामध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाल आनंद मेळाव्यानिमित्त विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मनीषा आनंदकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तसेच नगरसेविका सोनाली गोरे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदकर बी.बी., सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सेवकवृंद आणि पालक यांनी सर्वांचे कौतुक केले. याप्रसंगी नगरसेविका गोरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.

COMMENTS