गेवराई । प्रतिनिधीतालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची

गेवराई । प्रतिनिधी
तालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य थिटे ए. एस. उपस्थित होते.
जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच जिल्ह्याच्या मा.खा.स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात बोलताना प्राचार्य थिटे यांनी सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे क्रांतिकारी विचारवंत आणि महिला सक्षमीकरणाचे प्रवर्तक होत्या. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या जननी होत्या. त्यांनी अंधश्रद्धा आणि जुनाट रूढी-परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला ज्ञानाच्या माध्यमातून मुक्त करण्याचे संदेश दिले. प्राचार्य थिटे यांनी सर्वांना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील अनेक विद्यार्थीनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या वेशभुषेत उपस्थित होत्या. कार्यक्रमात पर्यवेक्षक राजेंद्र रांजवण, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक राजेशकुमार पंडित यांनी केले तर सत्राचे सुत्रसंचालन चंद्रशेखर जामकर यांनी केले.

COMMENTS