Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावित्रीआई म्हणजे मायेचा सागर होय ः विवेकजी मदन

अकोले ः जन्मदात्या आईने जन्म दिला, संस्काराचे बाळकडू दिले.माणूस म्हणून जगायला, उभ राहायला शिकविले.निरागसतेने,आईच्या मायेने त्या इतरांशी बोलायच्या

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा
मनसेने घातला महाविकास आघाडी सरकार पुतळ्यास दारूचा अभिषेक
इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 

अकोले ः जन्मदात्या आईने जन्म दिला, संस्काराचे बाळकडू दिले.माणूस म्हणून जगायला, उभ राहायला शिकविले.निरागसतेने,आईच्या मायेने त्या इतरांशी बोलायच्या.म्हणूनच आई सावित्रीआई म्हणजे मायेचा सागर होय, असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष विवेकजी मदन यांनी केले. थोर स्वातंत्र्यसेनानी,सत्यनिकेतन संस्थेच्या संस्थापक कोषाध्यक्षा श्रीमती सावित्रीबाई मदन यांच्या 26 व्या पुण्यस्मरणानिमित्त राजूर येथील संस्थेच्या कन्यानिवास वसतिगृहात अभिवादन करण्यात आले.याप्रसंगि विवेकजी मदन विचारमंच्यावरून बोलत होते.
यावेळी संचालक मिलिंदशेठ उमराणी, श्रीराम पन्हाळे, एस.टी.येलमामे, विजय पवार, रामजी काठे, लेखापाल विलास पाबळकर, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख, भाऊसाहेब बनकर, बादशहा ताजणे, मधुकर मोखरे, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी, माजी मुख्याध्यापक संजय शिंदे, अधीक्षीका श्रद्धा जोशी, फुला कानवडे,सुमित पवार यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थीनी उपस्थित होते.
कोषाध्यक्ष विवेकजी मदन यांनी पुढे बोलताना सेवाभाव हा सद्गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात मोठ्या प्रमाणावर होता.निष्काम कर्मयोगाचा संदेश स्वतःबरोबर इतरांच्याही जीवनात उतरवला.त्यांचे सामर्थ्य अफाट होते. आई म्हणजे सामाजिक कार्याबरोबरच कुटुंबाचे नाते संबंध जोपासणारे अनोख व्यक्तिमत्व असल्याचे विचार व्यक्त करत आईचें दैनंदिन जिवनचरित्र स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचालक एस. टी. येलमामे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. संतराम बारवकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवाद प्रतिमापूजनाबरोबरच संतराम बारवकर, बाळासाहेब घिगे, बीना सावंत, किशोर देशमुख तसेच विदयार्थीनी यांच्या सुमधूर गायनात सर्वधर्म प्रार्थनेने झाली. तर समारोप वंदेमातरम ने करण्यात आला.

COMMENTS