Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहा एप्रिल रोजी बीडमध्ये सावरकर गौरव यात्रा

बीड प्रतिनिधी - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समर्थनाथ बीडमध्ये 6 एप्रिल रोजी भव्य गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी शासकीय रेस्ट हा

नवे वर्ष, नवा जल्लोष
* निघोज कुरुंद पठारवाडी पुन्हा कोरोना हॉटस्पॉट! l पहा LokNews24*
नऊ वर्षाच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोघांना अटक

बीड प्रतिनिधी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समर्थनाथ बीडमध्ये 6 एप्रिल रोजी भव्य गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी शासकीय रेस्ट हाऊस मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी माहिती दिली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावकाराबद्दल अभद्र टिपणी केल्याच्या निषेधार्थ सावरकरांचा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभर सावरकर गौरव यात्रा काढण्याचे आदेश दिले आहेत, क्रांतिवीर सावरकर यांचे विचार सामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी बीडमध्ये 6 एप्रिल रोजी दत्त मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून जवाहर कॉलनी येथील सावरकर स्मारकाजवळ ही शोभायात्रा संपेल या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार सुरेश धस संबोधित करणार आहेत या शोभयात्रेमध्ये सावरकरा बद्दल विविध माहिती देण्यात येणार असून सामान्य नागरिकापर्यंत व तरुण पिढीला क्रांतिकारी विचारांची माहिती देण्यात येणार आहे. या शोभे यात्रेची पूर्वतयारी म्हणून महायुतीचे सर्व घटक एकत्रित बैठक घेऊन ही गौरव यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी म्हटले या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे जिल्हा संघटक नागरगोजे शिवसेनेचे नेते चंदू नवले भारतीय जनता पार्टीचे विक्रांत हजारे सह आदींची उपस्थिती होती.

COMMENTS